सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील सुपा येथील नवीन वसाहतीत राहणार्या सोळा वर्षाच्या मुलीवर सुपा येथील एका युवकाने कुर्हाडीने वार केले....
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील सुपा येथील नवीन वसाहतीत राहणार्या सोळा वर्षाच्या मुलीवर सुपा येथील एका युवकाने कुर्हाडीने वार केले. यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आरोपी जुबेर सादिक शेख याला सुपा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुपा गावातील जुबेर सादिक शेख याची व माझा मोठा भाऊ करण यांची ओळख असून जुबेरची बहीण मुस्कान व माझा भाऊ करण सुपा येथे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळी त्यांच्यात मैत्री होती. सोमवारी (दि. २४) सायंकाळी ७ वा. चे सुमारास मी व माझा लहान भाऊ वैभव आमचे शेजारी दादा मेटे यांचे घरात टीव्ही बघत असताना तेथे माझ्या भावाच्या ओळखीचा सुपा गावात राहणारा जुबेर सादीक शेख हा हातात कु-हाड घेवून आला व मला म्हणाला की, तुझा भाऊ करण कोठे आहे. तो माझ्या बहीणीला पळून घेवून गेला आहे.
त्यावेळी माझ्या आईला फोन करत असताना जुबेर याने त्याच्या हातातील कु-हाडीने अचानक माझ्या डाव्या हाताच्या काबीवर वार केला. हातास मोठी जखम होवून त्यातून रक्तस्त्राव होवू लागला. त्याने पुन्हा कुर्हाडीने माझ्या डाव्या हाताच्या बोटावर मारुन जखमी केले. तसेच माझ्या डोयावर कपाळावर कुर्हाडीच्या उलट्या बाजुने मारुन जखमी केले. मला जुबेर मारहाण करत आसताना तेथे दादा मेटे यांची पत्नी सरला या घरामध्येच होते. त्यावेळी मी व सरला मेटे आम्ही आरडाओरडा केला आसता शेजारी रहाणारे किशोर मडके, रविद्र नरड हे मदतीला आले असता जुबेर शेख हा कुर्हाड घेऊन तेथुन पळून गेला.
तेथे जवळच रहात आसलेले माझे चुलते व इतरांनी मला रुग्णालयात दाखल केले अशी फिर्याद दिली. सुपा पोलिसांनी त्या आल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन जुबेर सादीक शेख यांच्या वर महिला अत्याचार विरुध कायदा ३०७, ३२६, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला असुन फरार जुबेर यास सुपा पोलिसांनी मंगळवार दि. २५ एप्रिल रोजी कामरगाव येथुन अटक केली. बुधवार दि २६ एप्रिल रोजी आरोपी जुबेर यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २९ एप्रिल पर्यत पोलिस कोठडी दिली आहे.
आरोपी जुबेर सादीक शेख याने अल्पवयीन मुलीवर केलेल्या जीव घेण्या खुनी हल्ल्यामुळे सुपा हादरुन गेले असुन या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार, यशवंत ठोंबरे यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS