मुंबई / नगर सह्याद्री - एका वकिलाने थेट सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहेत. त्यात, शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेने...
मुंबई / नगर सह्याद्री -
एका वकिलाने थेट सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहेत. त्यात, शिवसेना भवन, शिवसेनेच्या सर्व शाखा आणि शिवसेनेचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार अॅड. आशिष गिरी यांनी ही नवी याचिका कोर्टात दाखल केली आहे. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्यावा, अशी मागणी आशिष गिरी यांनी याचिकेतून केली आहे. या याचिकेवर येत्या 24 तारखेला सुनावणी करण्याची विनंतीही त्यांनी कोर्टाला केली आहे. मात्र, कोर्टाने त्यावर अजून काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, आशिष गिरी यांनी सादर केलेल्या याचिकेचा आणि शिंदे गटाचा काही संबंध आहे की नाही याची काही माहिती मिळालेली नाही.
ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या 24 एप्रिलला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी ठाकरे गटाने याचिका सादर केली होती. या याचिकेसोबत आता पुन्हा नवी याचिका कोर्टात दाखल झाली आहे. त्यामुळे कोर्ट येत्या 24 तारखेला गिरी यांचीही याचिका सुनावणीसाठी घेणार की या याचिकेवर इतर दिवशी सुनावणी ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS