अहमदनगर | नगर सह्याद्री संपूर्ण जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणार्या भगवान महावीर स्वामींची जयंती (जन्मकल्याणक) मंगळवार दि.४ एप्रिलला साजर...
अहमदनगर | नगर सह्याद्री
संपूर्ण जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणार्या भगवान महावीर स्वामींची जयंती (जन्मकल्याणक) मंगळवार दि.४ एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त अहमदनगर सकल जैन समाजातर्फे शहरात भव्य शोभायात्रा, चौक सजावट, रांगोळी स्पर्धा, भक्तीसंध्या अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या विशेष सहकार्यातून हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती कापडबाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी दिली.
महावीर जयंतीदिनी दि.४ एप्रिलला सकाळी ७.३० वाजता कापड बाजार जैन मंदिरापासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. शोभायात्रेत सनई, नगारा, चौघडा, बॅण्ड पथक, घोडेस्वार, उंट स्वार, डोयावर मंगल कलश घेतलेल्या मुली, विविध वेशभूषा परिधान केलेले लहान मुले, मुली, पांढरे वस्त्र परिधान केलेले पुरुष व केसरी, पिवळ्या, लाल साड्या परिधान केलेल्या महिला सहभागी होणार आहेत. भगवान महावीर स्वामींची भव्य प्रतिमा असलेले वाहन, रथ व शेवटी अनुकंपाची (प्रसाद) गाडी असणार आहे. शोभायात्रा कापडबाजार, अर्बन बँक चौक, घुमरे गल्ली, गुजर गल्ली, आदेश्वर जैन मंदिर, लक्ष्मी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, नवीपेठ जैन स्थानक, घासगल्ली, महात्मा गांधी रोड, तेलीखुंट चौक, दाळमंडई, आडतेबाजार, गंजबाजार, सराफबाजार, जुना कापडबाजार, शिंगवी चष्माघर, खिस्तगल्ली, बुरूडगल्ली, जुनी वसंत टॉकीज, सहकार सभागृहमार्गे धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम येथे दाखल होईल.
शोभायात्रेनंतर आनंदधाम येथे महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज, प्रबुध्द विचार आदर्शऋषीजी महाराज, पंडितरत्न पूज्य पद्मऋषीजी महाराज, संस्कारप्रेमी पूज्य अलोकऋषीजी महाराज, साध्वीजी पूज्य सत्यप्रभाजी म.सा., पूज्य त्रिशलाकंवरजी, म.सा., पूज्य पुष्पकंवरजी म.सा, पूज्य दिव्यदर्शनाजी म.सा, पूज्य सम्यकदर्शनाजी म.सा, पूज्य विश्वदर्शनाजी म.सा., पूज्य उदयप्रभाजी म.सा., पूज्य अर्चनाश्रीजी म.सा., पूज्य विचक्षणाजी म.सा., पूज्य सुचेताजी म.सा., पूज्य आराधनाश्रीजी म.सा., पूज्य पियुषदर्शनाजी म.सा., पूज्य विभक्तीजी म.सा आदी साधूसाध्वीजींच्या उपस्थितीत भगवान महावीर स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रवचन तथा गुणगाण होईल. कार्यक्रमानंतर माणिकचंद, पेमराज, संतोष, सतीष बोथरा परिवारातर्फे गौतम प्रसादीची व्यवस्था करण्यात आली आहे.
महावीर जयंतीनिमित्त नगर शहरात चौक सजावट, रांगोळी स्पर्धा होणार आहे. यात प्रथम ११०० रुपये, व्दितीय ९०० रुपये, तृतीय ७०० रुपये व २५० रुपयांची सहा उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत. इच्छुकांनी नाव नोंदणी कापडबाजार जैन मंदिरात करायची आहे. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण शैला गांधी व सरोज कटारिया करणार आहेत. शोभायात्रेत सुरूवातीपासून शेवटपर्यंत सहभागी होणार्या भाविकांसाठी प्रमुख मार्गावर तीन ठिकाणी लकी ड्रॉ कुपनचे आयोजन करण्यात आले आहे. यातील भाग्यवान विजेत्यांना प्रथम बक्षिस ३०० रुपये, व्दितीय बक्षिस २०० रुपये तर तृतीय बक्षिस १५० रुपये देण्यात येईल. डोयावर कलश (घडा) घेणार्या लहान मुलींसाठीही बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. जैन बांधवांनी यादिवशी आपल्या घरावर जैन ध्वज लावून घरासमोर रांगोळी काढून शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जैन ध्वज कापडबाजार जैन मंदिरात मोफत उपलब्ध आहे. चौक सजावट स्पर्धेत प्रथम बक्षिस २५०० रुपये, व्दितीय बक्षिस १५०० रुपये, तृतीय बक्षिस १ हजार रुपये असेल तसेच ३ उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी ५०० रुपये देण्यात येतील. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता आनंदधामच्या प्रांगणात जैन सोशल फेडरेशनतर्फे भक्तीसंध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सूरमई शाम भगवान महावीर के नाम हा भक्तीसंध्येचा भव्य कार्यक्रम होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, बडी साजनचे अध्यक्ष पेमराज बोथरा, धार्मिक परीक्षा बोर्डचे सेक्रेटरी संतोष बोथरा, उपाध्यक्ष बाबूशेठ लोढा, वसंत लोढा, भैरूलाल कांकरिया, माणिकनगर जैन मंदिराचे अशोक मुथा, तलकशीभाई सावला, दिगंबर जैन समाजाचे महावीर बडजाते, नरेंद्र लोहाडे, ड.संतोष भोसे, संजय महाजन, महावीर गोसावी, जैन गुजराथी समाजाचे अध्यक्ष विजयभाई शहा, एच.व्ही.शहा, कमलेशभाई गांधी, मयुरभाई मेहता, बाबूशेठ बोरा, डॉ.प्रकाश कांकरिया, महावीरनगर श्री संघाचे अध्यक्ष अनिल कटारिया, भिंगारचे अध्यक्ष विलास मुनोत, केडगावचे अध्यक्ष पनालाल बोकडिया, आगरकर मळा श्री संघाचे उपाध्यक्ष सुरेश पगारिया, सेक्रेटरी अभय कोठारी, विनायकनगर श्री संघाचे अध्यक्ष किशोर पितळे, सावेडीचे अध्यक्ष जवाहरलाल कटारिया, व शांतीलाल बोरा, सिव्हिल हडको जैन मंदिराचे अध्यक्ष प्रफुलभाई मेहता, सी.ए.राजेशभाई शहा, सिव्हिल हडको श्रावक संघाचे अध्यक्ष विजयलाल गुगळे यांच्यासह नगरसेवक विपुल शेटिया, उपसभापती मीनाताई चोपडा, आनंदराम मुनोत, श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष गांधी, सचिन डुंगरवाल, महेश भळगट, सिमंधर स्वामी भक्त मंडळ, जैन मंदिर ट्रस्टी मंडळ, भिंगार, केडगाव, सावेडी व सर्व उपनगर, नगरमधील भारतीय जैन संघटना, जैन सोशल फेडरेशन व सकल जैन संघाच्या पदाधिकार्यांनी केले आहे.
COMMENTS