पुणे / नगर सहयाद्री - जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाल्याची बातमी समोर अली आहे. इनोव्हा चालकाचे गाडीवर...
पुणे / नगर सहयाद्री -
जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाल्याची बातमी समोर अली आहे. इनोव्हा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे समोरून येणाऱ्या पीकअपला तिने जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.ही धडक एवढी भयानक होती की, इन्व्होवा गाडीत असणाऱ्या सहा पैकी पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,जुन्नर तालुक्यात हा भीषण अपघात घडला. नगर-कल्याण महामार्गावरील वाटखडे या गावाजवळ हा अपघात झाला. इनोव्हा कार आळेफाटा तर पिकअप जीप कल्याणच्या दिशेने जात असताना इनोव्हाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पीक अप जीपला तिने जोरात धडक दिली.
या अपघातात सहा पैकी पाच जणांचा मृत्यू झाला. मृतदेह रुग्णालायात शवविच्छदेनासाठी पाठवण्यात आले आहे. रात्रीची वेळ असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण गेले. त्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर गटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती.
COMMENTS