पारनेर | नगर सह्याद्री पतसंस्था क्षेत्रात अल्पावधीतच गरूडझेप घेतलेल्या पारनेर तालुयातील वासुंदे येथील गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेला दि.३१ म...
पतसंस्था क्षेत्रात अल्पावधीतच गरूडझेप घेतलेल्या पारनेर तालुयातील वासुंदे येथील गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेला दि.३१ मार्च अखेर २ कोटी ८५ लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थापक चेअरमन बा. ठ.झावरे यांनी दिली.
संस्थेंच्या मार्च २०२३ या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये २९ कोटी रुपयांची, कर्जामध्ये ३२ कोटी रुपयांची वाढ झाली असून संस्थेने मुख्य कार्यालयासह अवघ्या ७ शाखांच्या माध्यमातून १२ वर्षाच्या कालावधीमध्ये ११० कोटी ०४ लाख रुपये ठेवींचा टप्पा पार केला असून कर्ज वाटप १०० कोटी ३२ लाख रुपये केले आहे.संस्थेने विविध बँकामध्ये २२ कोटी १५ लाख इतकी सुरक्षित गुंतवणुक केली आहे.
संस्थेचा एकुण व्यवसाय २१० कोटी ३६ लाख रूपयांचा झाला आहे.दि.३१ मार्च २०२३ अखेर थकबाकीचे व एनपीएचे प्रमाण अत्यल्प राखण्यात यश आले आहे.सहकार खात्यांच्या नियमांना अधिन राहून कामकाज करताना संस्थाना तारेवरची कसरत करावी लागत असते अशा परिस्थीतीतही संस्थेंची गुणवत्ता राखण्यात व दर्जा उंचावण्यात यश मिळले आहे.संस्थेच्या स्थापनेपासून संचालक मंडळाने व्यवसायवृद्धीसाठी व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून नवनवीन योजना राबविल्या आहेत. ग्रामीण व शहरामधील सर्वसामान्य गोरगरिब व होतकरू युवकांना,व्यवसायिकांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्यासाठी पावले उचलली आहेत.
संस्थेने सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत नवनविन व प्रगत तंत्रज्ञानाचा ध्यास घेवून वाटचाल केल्यामुळे संस्थेची प्रगतीची घौडदौड चालु आहे. खातेदारांना अचुक व तत्पर सेवा देण्याच्या हेतूने तसेच सभासदांना कोणत्याही शाखेतून रक्कम काढता यावी व टाकता यावी यासाठी आधुनिक व नविन तंत्रज्ञावर आधारित कोअर बँकिंग प्रणालीचा स्विकार केला आहे. ग्राहकांना अत्याधुनिक व सर्व प्रकारच्या आवश्यक डिजीटल बँकिंग सेवा उपलब्ध झाल्याने संस्थेविषयीची विश्वासार्हता वाढण्यास मदत होऊन ग्राहकांचे आर्थिक व्यवहार जलद व सुलभ होण्यास मदत होऊन जनसामान्यांच्या मनात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.
ग्राहकांचे संस्थेंशी वाढत असलेले व्यवहार हे संस्थेप्रती असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे.संस्थेमध्ये ग्राहकांना दिला जाणारा आदर, आपुलकीची सेवा आणि खुप मोठी विश्वासाहर्ता या जोरावर संस्थेने ११० कोटी ठेवींची उद्दीष्टपूर्ती केली आहे. सभासदांचे सहकार्य, विश्वास व सेवक वर्गाची तत्पर, विनम्र सेवा यामुळे खर्या अर्थाने संस्थेची प्रगती झालेली आहे.सभासदांनी संस्थेप्रती दाखविलेल्या विश्वासास तडा जाऊ न देता सर्व संचालक मंडळ,सभासद, ठेवीदार,कर्जदार,सर्वसामान्य ग्राहक,हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांच्या बळावर संस्था वटवृक्षात रूपांतरीत होण्यास मदत होत आहे.संस्था प्रगतीपथावर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न भविष्यकाळातही करणार असून संस्थेवर टाकलेल्या विश्वासाबद्दल सभासद , ठेवीदार, कर्जदार व ग्राहकांचे संस्थापक चेअरमन बा. ठ.झावरे,संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी आभार मानले.
COMMENTS