मुंबई : नगर सह्याद्री उर्फी जावेद आणि तिच्या स्टाईलने सारेच थक्क होतात. कधी फळांचा तर कधी फोनचा ड्रेस घालून उर्फी तिचे फोटो शेअर करते, परंत...
मुंबई : नगर सह्याद्री
उर्फी जावेद आणि तिच्या स्टाईलने सारेच थक्क होतात. कधी फळांचा तर कधी फोनचा ड्रेस घालून उर्फी तिचे फोटो शेअर करते, परंतु आता उर्फीचा नवा पाहायला मिळणार आहे. उर्फीने सोशल मीडियावर माफी मागत तिने स्वतःला बदलणार असल्याचे सांगितले आहे. तुमचा यावर विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. उर्फीने स्वतः तिच्या सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी दर वेळी तिच्या कपड्यांवर प्रयोग करत असते. उर्फी दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे ती नेटिझन्सच्या निशाण्यावरही येते आणि लोक तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर अश्लील कमेंट्सही करतात. आता सोशल मीडियावर उर्फीची आणखी एक नवीन शैली पाहायला मिळाली आहे, ज्याने लोकांना धक्काच बसला आहे. खरं तर, प्रत्येकाच्या अपेक्षांच्या पलीकडे जात उर्फी जावेदने तिच्या ट्विटर हँडलवर माफीनामा पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने परिधान केलेल्या कपड्यांबद्दल लोकांची माफी मागितली आहे.
नेहमी लोकांना धक्का देणार्या उर्फी जावेदने नुकताच माफी मागणारा मेसेज लिहून सोशल मीडिया यूजर्सना चकित केले आहे. उर्फीने तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, ’मी जे परिधान करते त्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागतो. आतापासून तुम्हाला बदललेली उर्फी दिसेल. बदललेल्या कपड्यांसह. माफ करा. उर्फी जावेदची ही माफी पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. उर्फी हे बोलत आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. उर्फीचे हृदयपरिवर्तन झाले असे काय घडले हे लोकांना समजू शकत नाही. आता अभिनेत्री किती बदलली आहे, हे येणारा काळच सांगेल.
COMMENTS