मुंबई|नगर सहयाद्री- अभिनेत्री मोनिका बेदी ही पंजाबच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. मोनिकानं ’ताजमहाल’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रा...
मुंबई|नगर सहयाद्री-
अभिनेत्री मोनिका बेदी ही पंजाबच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. मोनिकानं ’ताजमहाल’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मोनिकानं त्यानंतर अनेक प्रोजेट्समध्ये काम केले. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या ’सुरक्षा’ या चित्रपटातून मोनिकानं पदार्पण केलं आहे. यानंतर मोनिकानं गोविंदासोबत देखील काम केले. मोनिका ही कधीच थांबली नाही. तिनं एकामागे-एक असे अनेक प्रोजेट्स केले. पण तुम्हाला माहितीये का? अचानक तिच्या आयुष्यात प्रेम आलं आणि त्यानंतर तिचं अभिनय क्षेत्रातील करिअर संपूष्टात आलं. म्हणायचं झालं तर तिचा आणि बॉलिवूडचा संपर्क तुटला.
मोनिकानं अभिनय क्षेत्राला राम-राम करण्याचं कारण ऊ गँग होती. जेव्हा दाउद इब्राहिम, अबू सालेम, छोटा राजन, हाजी मस्तान आणि करीम लाला यांना मुंबईत सगळेच घाबरायचे. त्या सगळ्यांना अनेकवेळा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये स्पॉट करण्यात आले. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. अशाच एका पार्टीत मोनिकाची भेट गँग च्या एका मेंबरशी झाली होती. १९९८ साली दुबईतील एका पार्टीत अबू सालेमनं मोनिकाला पहिल्यांदा पाहिलं होतं. तिला पाहताच क्षणी अबू सालेम तिच्या प्रेमात वेडा झाला.
पार्टीनंतर अबू सालेमनं नाव बदलून तो एक बिझनेसमॅन असल्याचे फोनवर सांगितले. मोनिका आणि अबू सालेम हे नंतर एकमेकांशी फोनवर सतत बोलू लागले. हळूहळू मोनिकाचा विश्वास अबू सालेमनं जिंकला आणि मोनिका त्याला तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगू लागली. मोनिका नेहमीच अबूच्या फोनची वाट पाहायची.मुलाखतीत तिने खुलासा केला फोनवर बोलत-बोलत ती व्यक्ती तिला इतकी आवडू लागेल की त्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय तिला राहवत नाही
COMMENTS