निघोज | नगर सह्याद्री साजिद वजीर तांबोळी व मंगेश कुंडलिक वराळ या दोघांनी शरद सहकारी बँकेच्या निघोज शाखेपुढे सिबिल वाढवून देउन आमच्यावरील अ...
निघोज | नगर सह्याद्री
साजिद वजीर तांबोळी व मंगेश कुंडलिक वराळ या दोघांनी शरद सहकारी बँकेच्या निघोज शाखेपुढे सिबिल वाढवून देउन आमच्यावरील अन्याय दूर करावा तसेच इतर काहीं मागण्यांसाठी बुधवारी उपोषण केले. दोन दिवस चाललेल्या या उपोषणाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, नगर सह्याद्री प्रतिनिधी दत्ता उनवणे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ तसेच अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांनी हे उपोषण सोडण्यात यावे तसेच वराळ व तांबोळी यांना या उपोषणाच्या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी शरद सहकारी बँकेच्या अधिकार्यांशी वेळोवेळी चर्चा केली.
ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ यांनी सहाय्यक निबंधक गणेश औटी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी लगेच सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी यांना निघोज येथे पाठवून बँक अधिकारी व उपोषणकर्त्यांशी चर्चा करीत मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान गुरुवार दि. ६ रोजी दुपारी चार वाजता साजिद तांबोळी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने शिरुर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच पाच वाजता त्यांच्यावर उपचार करुन पाठवण्यात आले. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी शरद सहकारी बँकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला व पुन्हा चर्चा केली.
त्यानंतर वरिष्ठ अधिकारीर्यांशी चर्चा करुन तुमच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे लेखी आश्वासन शरद सहकारी बँकेचे तक्रार निवारण अधिकारी रविंद्र नायकवाडी, शाखाधिकारी पांचाली वाघ यांनी तांबोळी व वराळ यांना दिल्यानंतर त्यांनी पंचायत् समितीचे माजी सदस्य दिनेश बाबर यांच्या हस्ते उसाचा रस घेऊन उपोषण सोडण्यात आले. या वेळी संदीप पाटील वराळ, जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, नगर सह्याद्री प्रतिनिधी दत्ता उनवणे, शरद सहकारी बँकेचे तक्रार निवारण केंद्र प्रमुख रविंद्र नायकवाडी, शाखाधिकारी पांचाली वाघ, अधिकारी गावडे, सहाय्यक कामगार तलाठी सुनिल उचाळे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, निघोज व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सतिष लोढा, विजय वराळ, पत्रकार योगेश खाडे, मुस्लिम समाजाचे तालुका पदाधिकारी हारुनभाई तांबोळी, वृत्तपत्र एजंट नौशादभाई तांबोळी, अमीर शेख, मुस्लिम समाजाचे युवा नेते मुज्जमील सय्यद, अस्लमभाई इनामदार, शोएब तांबोळी, उबेद तांबोळी, सुफियान तांबोळी, अफ्फान तांबोळी उपस्थित होते. उपोषणकर्ते मंगेश वराळ व साजिद तांबोळी यांनी नगर सह्याद्री बरोबर बोलताना सांगितले की हप्ता वेळेवर देउनही सिबील कमी दाखवून आमच्यावर अन्याय झाला होता. तो दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहोत.
COMMENTS