अहमदनगर | नगर सह्याद्री माझे वडील माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी हिंद सेवा मंडळाशी जोडलेले ऋणानुबंध मी पुढे घेवून जाणार आहे. ही माझीच संस्था आह...
अहमदनगर | नगर सह्याद्री
माझे वडील माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी हिंद सेवा मंडळाशी जोडलेले ऋणानुबंध मी पुढे घेवून जाणार आहे. ही माझीच संस्था आहे. हिंद सेवा मंडळाने मला हक्काने कोणतेही काम सांगावे. आता ही संस्था शतक महोत्सव साजरे करत आहे. त्यामुळे या संस्थेच्या शतक महोत्सवास शोभेल अशी मोठी अत्याधुनिक भेट मी हिंद सेवा मंडळाला देणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत संस्थेने मला भरपूर मदत केली. विजयानंतर सर्वांचे आभार मानून ऋण व्यक्त करण्यासाठी मी सारडा महाविद्यालयात आलो आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी केले.
नवनिर्वाचित आ.सत्यजित तांबे यांनी पेमराज सरडा महाविद्यालयास भेट देवून हिंद सेवा मंडळाने व संस्थेमधील प्राध्यापक व शिक्षकांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड.अनंत फडणीस यांनी आ.तांबे यांचा स्वागत करून सत्कार केला. यावेळी मानद सचिव संजय जोशी, माजी कार्याध्यक्ष अजित बोरा, महाविद्यालयाचे चेअरमन सुमतिलाल कोठारी, प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित आदींसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. अॅड.अनंत फडणीस म्हणाले, हिंद सेवा मंडळ व तांबे कुटुंबियांचे वर्षानुवर्षेचे ऋणानुबंध आहेत. आ.डॉ.सुधीर तांबे यांनी बर्याचदा संस्थेला आमदार निधीतून सहकार्य केले आहे.
आता त्यांचा वारसा सत्यजित तांबे चालवत आहेत. तरुण तडफदार व काम करण्याची धमक सत्यजित यांच्यात आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या मागे हिंद सेवा मंडळ व सर्व शिक्षक ठामपणे उभे राहिले.प्रास्ताविक आदिनाथ जोशी यांनी केले. प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचर्य डॉ.मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, संस्थेचे सहाय्यक सचिव बी.यू.कुलकर्णी व योगेश देशमुख आदीसह प्राध्यापक उपस्थित होते.
COMMENTS