अहमदनगर | नगर सह्याद्री आजचे युग हे स्पर्धेचे युग असून प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. शैक्षणिक, व्यावसायिक, राजकीय आदी क्षेत्र...
अहमदनगर | नगर सह्याद्री
आजचे युग हे स्पर्धेचे युग असून प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. शैक्षणिक, व्यावसायिक, राजकीय आदी क्षेत्रात तर स्पर्धेची तीव्रता जास्त आणि सहभागी होणारे कमी अशी परिस्थिती असते. विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेतल्याशिवाय स्वतःच्या गुणवत्तेची कल्पना येत नाही तेव्हा स्पर्धा कोणतीही असो सहभागी होऊन चांगली तयारी केल्यास यश मिळतेच, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या भाषणात केले.
संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ आडसूळ यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यावर भर दिला पाहिजे असे मत व्यक्त करत मोलाचे मार्गदर्शन केले.
आडसूळ तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर.एस. गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी महाविद्यालयाला शैक्षणिक सोयी सुविधा, अद्यावत ग्रंथालय उपलब्ध करुन दिल्यामुळे विद्यार्थ्यांना या सुविधांचा चांगला फायदा मिळतो व त्याचबरोबर आडसूळ तंत्रनिकेतनचे बहुसंख्य विद्यार्थी प्रत्येक स्पर्धेत भाग घेत यशाची परंपरा कायम राखत आहेत याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन केले.अहमदनगर येथील चासच्या सुंदराबाई माणिक आडसूळ तंत्रनिकेतनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे टेनोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्याचा झालेला विकास व ज्ञानाचे प्रत्यक्षात करावे लागणारे उपयोजन या गुणांच्या पडताळणीसाठी आयोजित केली जाते. तांत्रिक ज्ञानावर आधारित असलेल्या या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा, भित्तीफलक स्पर्धा, पेपर सादरीकरण व प्रकल्प सादरीकरण स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
पूर्ण जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून तंत्र शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून पारितोषिकही पटकावले.या स्पर्धेतिल प्रश्नमंजुषा स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन नगर येथील विद्यार्थीनी स्वामिनी भांड व पूजा शिरसाट प्रथम क्रमांक तर अडसूळ तंत्रनिकेतनचे विद्यार्थी यज्ञेश श्रीगडी, शुभम तेलोरे द्वितीय क्रमांक, भित्ती फलक स्पर्धेमध्ये शासकीय तंत्रनिकेतन नगर येथील विद्यार्थी स्नेहा घोरपडे व ओपाल राऊत द्वितीय क्रमांक तर अडसूळ तंत्रनिकेतनचे विद्यार्थी केशव गायकवाड व प्रतीक्षा चोरमागे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
प्रकल्प सादरीकरण स्पर्धेमध्ये पंकज अहिरप, वहाळ गोडळकर, अनिकेत भोर व जय बरमेचा हा गट प्रथम क्रमांक तर अक्षय्य रामपिरी, कल्याणी गिरघे, रेणुका गोरे व वैष्णन कुमखेले ह्या गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. पेपर सादरीकरण स्पर्धेमध्ये स्थापत्य विभागामधून ओंकार खेडकर आणि रेणुका घोडके प्रथम क्रमांकाचे तर साक्षी देवकर आणि ऋतिक तांबे द्वितीय क्रमांकाने झळकले, मेकॅनिकल विभागातून ओंकार लिपाने आणि रोहित कळमकर प्रथम क्रमांकाचे तर यश जाधव द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले, इलेट्रिकल विभागामधून उमेश भुजबळ आणि जिवन माने प्रथम क्रमांक तर यज्ञेश श्रीगडी व शुभम तेलोरे यांना द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले, इलेट्रॉनिस अँड टेलिकम्युनिकेशन विभागामधून तन्मय सोनवणे आणि सोहम बडे प्रथम क्रमांकाने तर समर्थ काळभोर आणि यश सुरवासे यांना द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. संगणक विभागामधून समृद्धी पटवा आणि गुंजन काकोरेजा प्रथम क्रमांकाने तर हर्ष आहुजा आणि कृष्णा दातरंगे यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषक मिळवून तंत्रनिकेतनचे नाव उंचावले. या सर्वांचे उपस्थितांनी अभिनंदन केले. दीपा इंडस्ट्रीजचे सोनार आणि आर.के. इंजिनियर्स चे सी.ई.ओ. रवींद्र कावळे, संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध माणिक आडसूळ, सचिव लीना आडसूळ, उपाध्यक्ष विश्वनाथ आडसूळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर. एस. गडाख तसेच सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आकांक्षा म्हस्के यांनी केले तर आभार विद्यार्थिनी प्रतीक्षा चोरमागे हिने मानले.
COMMENTS