अहमदनगर | नगर सह्याद्री शहरातील गावठाण भागातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. २०१९ साली या रस्ता डांबरीकरण कामासाठी न...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरातील गावठाण भागातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. २०१९ साली या रस्ता डांबरीकरण कामासाठी निधी प्राप्त झाला होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे कामे मार्गी लागली नाही. मी महापौर झाल्यानंतर ही कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. महापालिकेच्या माध्यमातून ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळेच ही कामे आज मार्गी लागली. जिल्हाभरातून नागरिक व्यवसायासाठी व खरेदीसाठी नगर शहरात येतात. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे होते, असे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले.
नगर शहरातील गावठाण भागातील चितळे रस्ता डांबरीकरणाची पाहणी महापौर शेंडगे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम नळकांडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गेनाप्पा, अमोल सुरसे, कैलास शिंदे, संदीप दातरंगे यांनी केली.
स्थायी समितीचे सभापती कवडे म्हणाले, नगर शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामावरून जे श्रेय घेण्याचे काम करतात त्यांनी भाजपचा महापौर असताना ही कामे का नाही केली. २०१९ साली ही कामे मंजूर होती. त्यानंतर डांबराच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे ठेकेदारांनी ती कामे केली नाही. महापौर शेंडगे यांनी तांत्रिक अडचणी दूर करून महापालिकेच्या माध्यमातून ६० लाख रुपयांची निधीची तरतूद केली. त्यामुळे गावठाण भागातील रस्त्यांची कामे मार्गी लागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी आमदार स्व. अनिल राठोड यांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करतो. शहरात सुरू असलेल्या विकास कामांत कोणीही लुडबुड करू नये.
शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले, शहरातील गावठाण भागातील दुर्लक्षित रस्ता डांबरीकरणाची कामे महापौर शेंडगे यांनी मार्गी लावली. बांधकाम विभागांतर्गत ही कामे सुरू असतानाही तांत्रिक अडचणी झाल्या होत्या. त्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी लक्ष घालून मार्गी लावले आणि ती कामे पूर्ण केली असे ते म्हणाले.
COMMENTS