श्रीगोेंदा | नगर सह्याद्री शिवाजीराव नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करतील.कार्यकर्त्यांनीही काँग्...
श्रीगोेंदा | नगर सह्याद्री
शिवाजीराव नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करतील.कार्यकर्त्यांनीही काँग्रेस विचारधारा समोर ठेवून कामाला लागावे. २०२४ ला महाविकास आघाडीच्या नागवडे घराण्याच्या अनुराधाताई नागवडे आमदार होतील, असे संकेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ढोकराई येथे तालुका काँग्रेस पक्षातर्फे सत्कार व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. थोरात म्हणाले, श्रीगोंदा तालुयाचे भाग्यविधाते स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी अखेरच्या श्वासापर्यत पक्षाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे काँग्रेस वाढवण्याचे काम केले. स्व. बापूनीं सर्वसामान्यांच्या हितासाठी श्रीगोंदा तालुयात सहकार, शिक्षण, सिंचन क्षेत्रात भरीव योगदान दिले. सहकारातून श्रीगोंदा तालुका समृद्धीकडे नेला.
सहकार महर्षी बापूंनी राज्यातील सर्वच धुरंधर नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले. श्रीगोंदा तालुक सोपा तालुका नव्हे, तरी देखील बापूंनी काँग्रेसच्या माध्यमातून तालुयाला वैभव प्राप्त करून दिले. तोच वारसा समोर ठेऊन राजेंद्र नागवडे व अनुराधाताई नागवडे काम करत आहेत. काँग्रेसने देखील त्यांच्या कार्याची दखल म्हणून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. अनुराधाताई नागवडे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तम काम पाहत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला उज्वल भविष्य आहे. जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी देण्यासाठी नागवडे निश्चित यशस्वी होतील. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नागवडेंना उमेदवारी देण्यासाठी आग्रही राहू. केंद्र व राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे. महागाई, बेरोजगारी या प्रश्नावर पंतप्रधान कधीच बोलत नाहीत. सुप्रीम कोर्टाने देखील राज्य सरकारला फटकारले आहे. आता वारे बदलले आहे. राहुल गांधींवर आकसापोटी कारवाई केली जाते.
श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे म्हणाले, स्वर्गीय बापूंनी तालुयातच नव्हे जिल्ह्यात कष्टकरी शेतकर्यांवर प्रेम करून विकासाची दिशा दिली. श्रीगोंदा तालुयाचा सर्वांगीण विकास करत तालुका सर्वच क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने आघाडीवर ठेवला.
सत्काराला उत्तर देताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, माजी मंत्री थोरात यांच्या माध्यमातून काँग्रेसची जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. स्वर्गीय बापूंनी देखील श्रीगोंदा तालुयात काँग्रेसचे काम निष्ठेने केले. सहकाराच्या माध्यमातून बापूंनी सहकार सिंचन शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देत पायाभरणी केली. सद्यस्थितीत तालुयातील काही नेत्यांनी पवार कुटुंबियांच्या नावाने मते मागून त्यांनाच फसवण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुयाच्या आगामी विधानसभेसाठी आम्ही महाआघाडीकडून नागवडे कुटुंबीयांच्या अनुराधाताई नागवडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी घेणार असून २०२४ ला काँग्रेस पक्षाचाच आमदार विजयी होईल, असे सांगून काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी सोपवली ही सक्षमपणे पार पाडू. काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नागवडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्यानंतर अनुराधाताई नागवडे व राजेंद्र नागवडे हे सर्व क्षेत्रात उत्तमरीत्या काम पार पाडत आहेत. राज्यात देशमुख -थोरात- नागवडे या घराण्यांचे काँग्रेस पक्षाला राज्यात प्रेरणादायी नेतृत्व लाभले. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एक निष्ठावंत नागवडे यांच्या रूपाने नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे निश्चितच श्रीगोंदा तालुका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असल्याचे सांगितले.
COMMENTS