अहमदनगर | नगर सह्याद्री १९७८ साली भारतीय जनता पार्टीचे लावलेले छोटेसे रोपटे आज पूर्ण देश व्यापणारा महाकाय वटवृक्ष झाला आहे. नगर शहरातही पक्ष...
अहमदनगर | नगर सह्याद्री
१९७८ साली भारतीय जनता पार्टीचे लावलेले छोटेसे रोपटे आज पूर्ण देश व्यापणारा महाकाय वटवृक्ष झाला आहे. नगर शहरातही पक्ष आज मजबूत स्थितीत आहे. भाजपाच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक व विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेनेला बरोबर घेत जिंकून निष्ठावंत कार्यकर्ताच आमदार व महापौर होईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
भारतीय जनता पार्टीचा ४५ वा स्थापना दिन नगर शहरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. त्यानंतर झालेल्या शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भैय्या गंधे बोलत होते.या मेळाव्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा शिर्डी येथील नियोजित दौरा, महात्मा फुले जयंती,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी उपमहापौर मिनल ढोणे यांनी शुभेच्छा दिल्या.
सरचिटणीस अॅड. विवेक नाईक यांनी प्रास्ताविक केले. महेश नामदे यांनी आभार मानले.यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, अजय चितळे, पंकज जहागीरदार, ज्ञानेश्वर काळे, महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रिया जाणवे, संजय ढोणे, नरेंद्र कुलकर्णी, सुमित इपलपेल्ली, बाळासाहेब भुजबळ, सुनील सकट, मयूर ताठे, दत्ता गाडळकर, नितीन शेलार, राहुल रासकर, गोपाल वर्मा, लक्ष्मिकांत तिवारी, प्रशांत मुथा,प्रदीप परदेशी, संतोष गांधी उपस्थित होते.
COMMENTS