निघोज | नगर सह्याद्री मुलिंना उच्च शिक्षणासाठी सुविधा मिळवून देत आई वडील यांनी प्रेरणा देण्याचे आवाहन सुपा येथील पोलिस निरीक्षक ज्योती गडक...
निघोज | नगर सह्याद्री
मुलिंना उच्च शिक्षणासाठी सुविधा मिळवून देत आई वडील यांनी प्रेरणा देण्याचे आवाहन सुपा येथील पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले आहे. निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात आई माझ्या महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोन वेळा सर्वोत्तम गुणक्रमांकाने उत्तीर्ण झालेले गौरव वांढेकर, नंदा वसंत वांढेकर, संगीता शिंदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक मनीषा गाडीलकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रविण जाधव, प्राध्यापक वैशाली फंड इतर प्राध्यापक व माता तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाल्या की, मुलीला चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी मातेची आहे. आजच्या जगात सर्व क्षेत्रात मुलींचे वर्चस्व आहे. आई आयुष्यभर चुलीपुढे असते, का तर मुलगी पुढे जावी. आई आयुष्यभर संकटांशी लढते, का तर मुलगी पुढे जावी. आई हे विश्व आहे या आईचा सन्मान या महाविद्यालयात होतो ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगत पोलिस खात्यातील संघर्षमय प्रवास सांगत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. गौरव वांढेकर यांनी आईचे जिवणातील महत्व विशद करीत महाविद्यालयात सुरू असलेला उपक्रम राज्यभर राबविणार असल्याची ग्वाही दिली. प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले की, मीडियाच्या माध्यमातून येणार्या बातम्या ऐकून आणि आजूबाजूला घडणार्या घटना पाहून प्रत्येक आई ही आपल्या मुलीला सक्षम बनवू पाहत आहे. तिला लढण्यासाठी ताकद देऊ पाहत आहे. परंतु आपली मुलगी घराबाहेर पडताना तिच्या काळजाचा ठोका चुकल्या शिवाय रहात नाही. सायंकाळी घरी परतताना मुलीला जर उशीर झाला तर आईच्या जीवाची उलाघाल होते. याच आईला जर मानसिक ध्येर्य द्यायचे असेल आणि तिला आपल्या मुलीच्यामागे भक्कमपणे उभे राहण्यास खंबीर करायचे असेल तर प्रत्येक आईला तिच्या मुलीच्या महाविद्यालयात आणणे गरजेचे आहे. मुलगी नेमकी कोणत्या वातावरणात शिकते, ती किती सुरक्षित ठिकाणी दिवसभर वावरते, तिचे शिक्षक कसे आहेत.
आणि सर्वात महत्वाचे तीच स्वतःच्या महाविद्यालयात नेमकं काय अस्तित्व आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं आईसाठी गरजेचं आहे.म्हणून आपली मुलगी पुढे जावी म्हणून नेहमी आईला सन्मानाने पुढे घेऊन जाण्यासाठी आईला महाविद्यालयात आमंत्रित करून दरवर्षी हा अभिनव उपक्रम राबवला जातो. असे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले.यावेळी १९० माता उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आई प्रति मुलीनी मनोगत व्यक्त केले. यात श्रुती लामखडे, ऋतुजा लाळगे, दामीनि पठारे, पूजा चौधरी, शुभांगी पालवे, पायल पांढरकर, शर्वरी लामखडे, शिवानी डहाळे, श्वेता शिंदे, ज्योती भामरे, विजया सुपेकर, दिव्या साळवे, वृषाली आवारी, सादिया शेख यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अनेक माता यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे प्राध्यापक विशाल रोकडे, प्राध्यापक आनंद पाटेकर, प्रा. डॉ.गोविंदराव देशमुख, प्रा. प्रविण जाधव, प्रा.मनीषा गाडीलकर, प्रा. पोपट सुंबरे, प्रा. सुमित गुणवंत, प्रा दुर्गा रायकर, प्रा स्वाती मोरे, प्राध्यापक दुर्गा रायकर, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. रुपाली गोरडे, प्रा. पूनम गंधात्त, प्रा. नूतन गायकवाड प्रा. संदीप लंके, प्रा. नवनाथ घोगरे, डॉ. पोपट पठारे, प्रा. सचिन निघूट, अश्विनी सुपेकर, प्रा. अक्षय अडसूळ, प्रा. संगीता मांडगे,प्रा. तुषार जगदाळे, प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. संगीता मांडगे, प्रा. अमृता दौंडकर, प्रा. नम्रता थोरात, प्रा. प्रियंका लामखडे, प्रा. श्रद्धा ठुबे, प्रा. अशोक कवडे, नवनाथ घोगरे, अक्षय घेमुड, किशोर बाबर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मनीषा गाडीलकर यांनी केले तर आभार प्राध्यापक नीलिमा घुले यांनी मांडले. सूत्रसंचालन प्राध्यापक वैशाली फंड यांनी केले.
COMMENTS