सुपा | नगर सह्याद्री पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यावरील ऊस तोड हंगाम संपून गावाकडे परतत होते. पारनेर तालुयातील सुपा बस स्थानकावर ऊस तोड महि...
सुपा | नगर सह्याद्री
पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यावरील ऊस तोड हंगाम संपून गावाकडे परतत होते. पारनेर तालुयातील सुपा बस स्थानकावर ऊस तोड महिलेला प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्या. डॉ. विलास काळे यांच्या सतर्कतेमुळे बसस्थानाकावरच महिलेची प्रसुती करत महिलेला जीवदान दिले.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी रात्री ऊस तोड मंजुर गावी परतरत असताना सुपा गावानजीक आल्यावर एका महिलेला प्रस्तृतीच्या वेदना जाणवू लागल्या, ऊस तोड मंजुरानी सुपा येथिल बस स्थानकाचा आश्रय घेतला. यावेळी काही नागरिकांनी १०८ रुग्णवाहीकाला फोन करून याबाबत माहिती दिली.रुग्णवाहीकेतील डॉटर विलास काळे यांनी तात्काळ धाव घेत त्या ऊसतोड महिलेची बाळासह सुखरूप प्रस्तुती केली.
डॉ. काळे व पायलट किशोर मडके यांच्या तत्परतेमुळे एका बाळाचे व आईचे प्राण वाचले. डॉ. काळे यांनी महिलेवर प्रथम उपचार करत पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील सिव्हील रुग्णालयात दाखल केले. डॉटर काळेंच्या प्रसंगवधनामुळे उस तोड महिलेचे प्राण वाचल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
COMMENTS