बीड। नगर सहयाद्री - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.मागील काही दिवसांपासू...
बीड। नगर सहयाद्री -
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात भूकंप होईल होणार अशी चर्चा होती. आता राष्ट्रवादीचे बीडचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी सुद्धा एक मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात लवकरचं राजकीय भूकंप होणार आहे. जी चर्चा आहे ते नक्की होणारचं आहे, असं सोळुंके पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार राजकीय भूकंप करतील आणि ते भाजपात जातील, अशा चर्चा रंगल्या होत्या. 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी बीड माजलगावमध्ये पत्रकार परिषद घेतली.
प्रकाश सोळुंके म्हणाले, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे.भाजपाला राज्यातील पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला काही ना काही चमत्कार करावा लागणार आहे. राज्यात सध्या जी चर्चा सुरू आहे, ते होणारचं आहे, त्यांच्याबद्दल कुणीही मनामध्ये शंका आणू नये", असं मोठं वक्तव्य केलं आहे.
पुढे म्हणाले, मी गेल्या काही दिवसांपासून मुंबईला गेलो नाही, माझी कुणाशी चर्चा झाली नाही. परंतु 35 वर्षाच्या राजकारणानंतर, राजकारणाचं काय होणं अपेक्षित आहे ? याची जाण मला आहे. म्हणून मी स्टेटमेंट दिलं. मात्र निश्चितचं काही ना काही भूकंप नक्कीच होण्याची परिस्थिती आहे". राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत त्यांनी एक प्रकारे राज्यात पुढच्या काही दिवसात, मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत दिले आहेत.
COMMENTS