नाशिक। नगर सहयाद्री - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. कर्नाटक मध्ये प्रचारादरम्यान मोद...
नाशिक। नगर सहयाद्री -
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. कर्नाटक मध्ये प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून हल्लाबोल केला होता. त्यावरून सुरत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यानं आणि राहुल गांधी दोषी ठरवल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. अगदी तशाच पद्धतीने गोपीचंद पडळकर यांच्यावरही कारवाई व्हावी अशा स्वरूपाची मागणी आता करण्यात आली आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठानकडून नाशिक पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पवार आडनावाबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून ही मागणी करण्यात आली आहे.
पवार आडनावाविषयी आणि पवार कुळाविषयी अपमानकारक, बदनामीकारक आणि धमकीच वक्तव्य केल्यामुळे भाजप आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्यावर कलम 295 आणि 298 या तरतुदीनुसार कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल करत असतात. गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागलीये, ती काढून टाकावी लागेल अशा स्वरूपाचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. ते वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
COMMENTS