मुंबई। नगर सहयाद्री - तारीख पे तारीख सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. ...
मुंबई। नगर सहयाद्री -
तारीख पे तारीख सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आज तरी सुनावणी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भातील याचिकेवर आज सुनावणी होणार का? आजही सर्वोच्च न्यायालय पुढची तारीख देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हे प्रकरण सातत्यानं लांबणीवर पडत आहे. आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश करण्यात आला असून आजच्या कामकाजात हे प्रकरण 39 नंबरवर सुनावणीसाठी आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात गेली आठ महिने 'तारीख पे तारीख' सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्यानं तारखा दिल्या जात आहेत. 29 मार्चपूर्वी 28 मार्च रोजी याबाबत सुनावणीची तारीख होती, पण घटनापिठाच्या कामकाजामुळे सुनावणी होऊ शकली नाही.
92 नगरपरिषदांमध्येही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, बदललेल्या वॉर्ड रचनेला दिलेलं आव्हान या गोष्टी कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या असल्यानं निवडणुका खोळंबल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी दिलेली आहे, 92 नगरपरिषदांसाठी केवळ निवडणूक आयोगाला आदेश द्यायचं काम बाकी आहे, असं गेल्या वेळी वकीलांनी कोर्टात सांगितलं होतं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका याआधी कोरोनामुळे, नंतर ओबीसी राजकीय आरक्षणामुळे आणि आता सत्ताबदलामुळे रखडल्याचं दिसतंय. महत्त्वाचे म्हणजे, याच निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालय मागच्या मे महिन्यात खूप आग्रही होतं. निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे, असा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल होता. त्यामुळे आता निवडणुका कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
COMMENTS