मुंबई। नगर सहयाद्री - बॉलिवूडचा खिलाडी कुमार नेहमीच आपल्या चित्रपटामुळे चर्चेत असतो.अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे जो वर्षाला ...
मुंबई। नगर सहयाद्री -
बॉलिवूडचा खिलाडी कुमार नेहमीच आपल्या चित्रपटामुळे चर्चेत असतो.अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे जो वर्षाला किमान ५ ते ६ चित्रपट करतो. मात्र सध्या त्याचे अनेक चित्रपट एकामागून एक फ्लॉप होताना दिसत आहे. त्यामुळे आता त्याच्या ‘रावडी राठोड’ या चित्रपटाच्या पुढील भागातून त्याला बाहेर जाणार आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘भूल भूल्लैया २’ मध्ये अक्षय दिसला नव्हता. आता असाच काहीसा प्रकार, ‘रावडी राठोड’च्या सिक्वेलमध्ये होणार आहे. चित्रपटामध्ये, २०१२ साली अक्षय कुमारचा ‘रावडी राठोड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत होती. या चित्रपटातील अक्षय कुमारचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला. हा चित्रपट हिट झाला आणि त्या पाठोपाठ आता या चित्रपटाच्या सिक्वेल निर्माते काम करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच ‘रावडी राठोड २’च्या शूटिंगच्या तारखा मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारने ‘रावडी राठोड’मध्ये अक्षयने दुहेरी भूमिका साकारली होती, त्याचा हा चित्रपट बराच ब्लॉकबस्टर ठरला. आता त्याच्या सिक्वेलमध्ये अक्षय कुमार असणार की नाही हे माहीत नाही. सध्या फक्त सिद्धार्थ मल्होत्राचे नाव घेतले जात आहे. नक्की ‘रावडी राठोड’मध्ये कोण प्रमुख भूमिका साकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
COMMENTS