नवी दिल्ली वृत्तसंस्था- कोलकत्ता येथील सोनारपूर मधल्या परिसरातून एक संतापजनक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपल...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
कोलकत्ता येथील सोनारपूर मधल्या परिसरातून एक संतापजनक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने आपल्या घरातील पाळीव कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिवर व्हायरल झाला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने घरामध्ये पाळीव कुत्रा एकटा असताना त्याच्यावर बलात्कार केला. यावेळी घरातून कुत्र्याचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता.त्यामुळे शेजारच्यांनी घरात डोकावून पाहिले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार झाल्याचे समजले. शेजाऱ्यांपैकी एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ रोकॉर्ड केला आहे. रतिकांत असं संबंधित ६५ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. सदर व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून या कुत्र्यावर अत्याचार करत आहे. अनेक व्यक्तींनी या बाबत त्यांची समजूत काढली होती. मात्र तरी देखील ६० वर्षीय रतिकांत यांनी हा प्रकार थांबवला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली. तसेच पोलिसांनी रतिकांत यांना अटक केली असून कुत्र्याची सुटका करण्यात आली आहे.
COMMENTS