अहमदनगर | नगर सह्याद्री- शहर विकासाचे प्रलंबित एक एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी सोडविण्याचे काम सुरू आहे. नागरिकांच्या सहकार्यातून व एकजुट...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
शहर विकासाचे प्रलंबित एक एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी सोडविण्याचे काम सुरू आहे. नागरिकांच्या सहकार्यातून व एकजुटीतून विकासाचे प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे उपनगरे झपाट्याने वाढत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला आहे. कराचीवाला नगर परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.
आता लवकरच या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. विकास कामांची पूर्ती करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्राधान्य क्रमाने एक एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी व दर्जेदार विकासाची कामे मार्गी लावली जात आहे. शहर विकासाच्या चांगल्या कामाच्या माध्यमातून नगरचे नाव देशपातळीवर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
आशिष पोखरणा म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षाचा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मर्गी लागला आहे. शहरातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.आता या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागले आहे. कराचीवाला नगर परिसरातील विविध प्रश्न प्रलंबित आहे ते सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न करावे जेणेकरून ते नक्की मार्गी लागतील.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नटराज हॉटेल ते सर्जेपुरा एसटी वर्कशॉप पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप, उद्योजक चंद्रकांत गाडे पाटील, माजी नगरसेवक आरिफ शेख, उद्योजक अमोल गाडे, अॅड. प्रसन्न जोशी, भुषण बिहाणी,प्रकाश पोखरणा, आशीष पोखरणा, विकी मुथा, श्रीकांत हेडा, प्रकाश खंडेलवाल, वरूण चोपडा, विश्वनाथ कासाट, बाळुसाहेब मालु, लक्ष्मीकांत झंवर,धीरज डागा, अशोक डागा,संतोष कासट, महेश इंदाणी, भरत चुडीवाल,मनोज बोरा, सिद्धार्थ मुथीयान,योगेश बजाज आदी उपस्थित होते.
COMMENTS