हवामान विभागाचा अंदाज ः अमेरिकेच्या धर्तीवर हीट इंडेक्स जारी मुंबई | नगर सह्याद्री एप्रिलनंतर आता मे महिन्यातही उष्णता जाणवणार नाही. पाकिस्...
हवामान विभागाचा अंदाज ः अमेरिकेच्या धर्तीवर हीट इंडेक्स जारी
मुंबई | नगर सह्याद्री
एप्रिलनंतर आता मे महिन्यातही उष्णता जाणवणार नाही. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व, ईशान्य आणि वायव्य भारत वगळता मे महिन्यातील तापमान ४० अंशांच्या पुढे जाणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अंदाजात म्हटले आहे, की यूपी, बिहार, झारखंड, प. बंगाल, ओडिशा, उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश किनारपट्टी, गुजरात किनारपट्टी आणि सीमावर्ती राजस्थान वगळता कोणत्याही भागात उष्ण लाटेची शयता खूप कमी आहे. तथापि बिहार, झारखंड, प. बंगाल आणि ओडिशात उष्ण लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त असू शकतात. मे मध्ये पश्चिम व मध्य भागातील राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. त्यामुळे तापमान कमी राहील. मे मध्ये सरासरी ६१.४ मिमी होतो. हवामान विभागाने अमेरिकी हवामान संस्था एनओएएच्या धर्तीवर भारतीय शहरांचा हीट इंडेस म्हणजे फील लाइक टेम्प्रेचर जारी करणे सुरू केले आहे. यात तापमानासाह हवेतील आर्द्रता जोडून लोकांना जाणवणार्या तापामानाची तुलना केली जाते.
सध्या हवामान खात्याने देशभरातच कमी उष्णतेचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून हवेत जास्त आर्द्रता असल्याने पश्चिम विक्षोभअधिक सक्रिय होईल की नाही हे आत्ताच सांगता येत नसल्याचेही म्हटले आहे. एप्रिल-मे मध्ये भारतीय भूमीवरील पृष्ठभागाच्या तापमानाचा थेट मान्सूनशी संबंध नाही. तो समुद्राच्या दोन टोकांच्या पृष्ठभागाच्या तापमानावर अवलंबून असतो व तो न्यूट्रल, अल-निनो आणि ला-नीना असतो. न्यूट्रलमध्ये मानसून सामान्य राहतो. अल-नीनोमध्ये कोरडा तर ला-नीनामध्ये जास्त पाऊस होतो.
सध्या न्यूट्रल स्थिती आहे. परंतु जुलै-ऑगस्टमध्ये अल-नीनोची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र मान्सूनची मदत करणारी घटना इंडियन डायपोल पॉझिटिव्ह होणे लवकर सुरू होईल. देशात पहिल्यांदा केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सामान्य तारीख १ जून आहे. याचा अचूक अंदाज १५ मेपर्यंत लागेल. तथापि, मेच्या दुसर्या ते तिसर्या आठवड्यापर्यंत अंदमान सागराजवळ बंगालच्या खाडीत एक समुद्री वादळ उठू शकते. ते देशातील काही भागात चांगला मान्सूनपूर्व पाऊस पाडू शकते.
COMMENTS