धुळे। नगर सहयाद्री - शिरपूर येथील सुंदरवाडी रोडवर भर दुपारी युवकाला जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला...
धुळे। नगर सहयाद्री -
शिरपूर येथील सुंदरवाडी रोडवर भर दुपारी युवकाला जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. उधारीच्या वादातून घटना घडल्याची माहिती समोर अली आहे. राजू सुदाम कोळी (वय ३२) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात याने शहर पोलिस दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,राजू सुदाम कोळी हा सेंट्रींग कामगार होता. मृत राजूला दारू पिण्याचे व्यसन होते. व्यसन भागवण्यासाठी तो किस्मतनगर येथे जाऊन दारू पीत होता. दारूच्या उधारीचे पैसे थकल्याने काही जणांशी त्याचा वाद झाला होता. संशयितांनी त्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकीही दिली होती.रविवारी दुपारी तो दारू पिण्यासाठी किस्मतनगरमध्ये गेला. त्यावेळी संशयितांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली.
राजूचे भाऊ राकेश, गणेश व नीलेश भांडण सोडवण्यासाठी गेले. संशयितांनी त्यांनाही मध्ये पडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. भांडण सोडवल्यानंतर त्यांनी राजूला घरी नेले. त्यावेळी त्याच्या कानातून रक्तस्राव सुरु होता. घरी पोहचल्यावर राजू झोपून गेला. सायंकाळी सहाला त्याला झोपेतून उठवण्यासाठी गेले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मृत झाल्याचे घोषित केले.
COMMENTS