मुंबई। नगर सहयाद्री - मुंबईच्या कामगार नगर येथील शरद सोसायटीत महिला सब-इन्स्पेक्टरचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या नेहरू नग...
मुंबई। नगर सहयाद्री -
मुंबईच्या कामगार नगर येथील शरद सोसायटीत महिला सब-इन्स्पेक्टरचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर अली आहे. शीतल एडके असे या ३५ वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या नेहरू नगर येथील महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह राहत्या घरात मृतदेह आढळला आल्याचे सांगितले. मूळच्या नगर येथील रहिवासी शीतल एडके असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. गेल्या दीड वर्षापासून आजारपणाच्या सुट्टीवर होत्या.
शीतल एडके या मुंबईतल्या नेहरु नगर भागात असलेल्या भाडे तत्त्वाच्या घरात रहात होत्या. त्यांचा मृतदेह घरातच होता. त्या मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर शीतल एडके यांचा मृतदेह या घरात आढळून आला. प्राथमिक तपासात हे प्रकरण आत्महत्येचं आहे असं पोलिसांना वाटतं आहे. पोलिसांनी या प्रकरणात ADR दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS