नवी दिल्ली वृत्तसंस्था- शरद पवार यांनी गौतम अदानी प्रकरणावरून काँग्रेसविरोधी भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
शरद पवार यांनी गौतम अदानी प्रकरणावरून काँग्रेसविरोधी भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केलाय. एका भाजप नेत्याने तर शरद पवार यांनी काँग्रेसला बसखाली ढकललं, अशाच शब्दात खोचक टीका केली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांचं हे ट्विट सध्या जोरदार चर्चा आहे.
अमित मालवीय यांचं ट्विट काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गौतम अदानी यांना उगाच टार्गेट केलं जातंय, असं वक्तव्य केलंय. त्यावरून अमित मालवीय यांनी लिहिलंय- शरद पवार यांनी काँग्रेसला बसखाली ढकललं आहे. सुप्रीम कोर्टाने अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची घोषणा केल्यानंतर जेपीसीची मागणी अप्रासंगिक आहे, असं पवार म्हणालेत. राहुल गांधी यांच्या वेडसरक कल्पनांमुळे काँग्रेस मित्रपक्ष पुन्हा सपशेल फोल ठरले. वीर सावरकरांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी चपराक लगावल्यानंतर ही सलग दुसरी वेळ आहे, अशी टीका मालवीय यांनी ट्विटद्वारे केली आहे.
COMMENTS