नागपूर। नगर सहयाद्री नदीपात्राती वाळूचा काळाबाजार राज्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे, वाळू माफियाविरोधात अन...
नागपूर। नगर सहयाद्री
नदीपात्राती वाळूचा काळाबाजार राज्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे, वाळू माफियाविरोधात अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाळूमाफियांना ठणकावले आहे. मी जोपर्यंत गृहमंत्री आहे तोपर्यंत वाळूचा काळाबाजार बंद राहणार असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार,नागपुरात क्रेडाई या रिअल स्टेट डेव्हलपर्स (बिल्डर्स) संघटनेच्या कार्यक्रमात बोलत होते. वाळूचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यासाठी राज्यात नवे वाळू धोरण लागू करत आहोत, नव्या धोरणानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात निश्चित ठिकाणी वाळूचे डेपो तयार करायचे आहे. तिथून वाळूची वाहतूक करणारा वाळू घेऊन जाऊन ग्राहकाला निश्चित ठिकाणी त्याचा पुरवठा करेल. त्यासाठी दर निश्चित केले जातील.ग्राहकांना मुबलक प्रमाणामध्ये वाळू मिळवून देण्याचे काम आम्ही करू असेही फडणवीस म्हणाले.
गृह विभागाचा कारभार सांभाळत असल्यापासून वाळूचा काळाबाजार थांबवण्यासाठी मी कठोर पावले उचलली आहेत, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. वाळूचा काळाबाजार करणाऱ्यांवर यापूर्वीही कारवाई केली आहे आणि अनेक वाळू माफियांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे मी गृहमंत्री असेपर्यंत वाळूचा काळाबाजार होऊ देणार नाही आणि तो सहन केला जाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
COMMENTS