मुंबई नगर सहयाद्री - लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या करिअरची सुरुवातच मुळात बोल्ड भूमिकेने केली. सई मराठी इंडस्ट्रीसाठी ...
मुंबई नगर सहयाद्री -
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या करिअरची सुरुवातच मुळात बोल्ड भूमिकेने केली. सई मराठी इंडस्ट्रीसाठी ट्रेण्ड सेटर ठरली. सईचा बिकिनीमधला फोटो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर तिने काही बोल्ड भूमिका करत चाहत्यांना चकीत केलं. सोबतच सईने ’दुनियादारी’, ’पॉण्डिचेरी’, ’तू ही रे’ , ’गर्लफ्रेंड’ सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना प्रेमाचा अर्थ समजावला.
’वजनदार’ सारख्या चित्रपटासाठी सईने तिच्या इमेजची पर्वा न करता तिचं वजन वाढवलं आणि तिच्या भूमिकेने चाहत्यांची मनं जिंकली. प्रत्येक चित्रपटात वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करणारी सई आता मात्र वेगळ्याच भूमिकांची वाट बघतेय. अनेक लव्हस्टोरी आणि हटके आशय असलेले चित्रपट केल्यानंतर आता तिला नेमके कोणते चित्रपट करायची इच्छा आहे हे तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
सईने नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टीं सांगितल्या. त्यातच तुला कोणत्या भूमिका करायला आवडतील असं विचारताच सईने तीन प्रकारच्या भूमिका करायच्या असल्याचं सांगितलं. ती म्हणाली, ’आजवर मला ऐतिहासिक भूमिकांसाठी कोणीही विचारलेलं नाही. मला कधीही अशा चित्रपटांसाठी विचारणा झाली नाही. पण मला ऐतिहासिक भूमिका करायला आवडतील. मी एक उत्कृष्ट कब्बडीपटू आहे. मला खेळाडू व्हायलाही आवडेल. एखाद्या चित्रपटात खेळाडूची भूमिका करायला मला आवडेल.’ यासोबतच आणखी एक भूमिका करून लोकांचा गैरसमज खोडून काढायचा असल्याचं तिने सांगितलं.
COMMENTS