भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार पारनेर। शरद झावरे - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी...
भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार
पारनेर। शरद झावरे -
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागेसाठी ४१ अर्ज शिल्लक राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी साह्य निबंधक गणेश औटी यांनी दिली आहे. पारनेर तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुक निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षांची महाविकास आघाडी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उतरली असुन भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार आहे.
पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रामुख्याने सेवा संस्थेच्या ११ जागेसाठी २४ उमेदवार, ग्रामपंचायत मतदार संघातील ४ जागेसाठी ८, व्यापारी मतदारसंघातील २ जागेसाठी ४, हमाल मापाडी मतदारसंघातील १ जागेसाठी ५ अर्ज दाखल करण्यात आले आहे. पारनेर कृषी बाजार समिती निवडणुकी साठी ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज यापैकी ११० उमेदवारांनी माघार घेतली असून सेवा संस्था मतदारसंघातून ७८ ग्रामपंचायत मतदारसंघातुन २३ व्यापारी मतदारसंघातून ५ तर हमाल मापाडी मतदारसंघातुन ४ उमेदवारांनी माघार घेतली आहे.
बेलकर गुरु राष्ट्रवादीकडून तर शिष्य भालेकर भाजपाकडून
वडनेर हवेलीचे सरपंच लहू शेठ भालेकर यांचे राजकीय गुरु म्हणून पाणी पंचायत समितीचे माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बेलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. परंतु माजी सभापती गंगाराम बेलकर यांचे शिष्य लहु भालेकर यांनी मात्र बाजार समिती निवडणुकीसाठी सेवा संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चेला भाजपमध्ये.. तर गुरु राष्ट्रवादी अशी चर्चा करण्या तालुक्यात रंगु लागली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खासदार सुजय विखे पाटील आमदार निलेश लंके व माजी आमदार औंटी यांच्या दृष्टीने बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे व शिवसेना यांच्यामध्ये वाटाघाटी झाल्यानंतर १८ जागेपैकी १३ जागा राष्ट्रवादी काँग्रेला तर शिवसेना पक्षाला ५ जागा देण्याबाबत चर्चेअंती निर्णय झाला.त्यामुळे आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्या निर्णयाने ही निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी
सोसायटी मतदारसंघ-
रामदास हनुमंत भोसले,दिलीप ज्ञानदेव मदगे, सुरेश ज्ञानदेव पठारे, गंगाधर भानुदास रोहोकले, अशोकराव साहेबराव सावंत, किसन पंढरीनाथ सुपेकर, आबासाहेब भाऊसाहेब खोडदे, प्रशांत सबाजीराव गायकवाड, संतोष मारुती आंधळे, संदीप लक्ष्मण साळके, स्वप्नील सुरेश मावळे, बाबासाहेब भीमाजी तरटे, अरुण रामभाऊ ठाणगे, संतोष शंकर पठारे, प्रकाश कोंडीबा ठाणगे,उत्तम दत्तात्रय पठारे
महिला राखीव -
सीताबाई महादु गायकवाड, संध्या कल्याण काळे, मेधा श्रीरंग रोकडे, पद्मजा श्रीकांत पठारे,
इतर मागास प्रवर्ग -
गंगाराम तुकाराम बेलकर, रामदास सावळे राम रसाळ,
विमुक्त जाती / भटक्या जमाती -
स्वप्नील नानासाहेब राहिंज, बाबासाहेब वामनराव नऱ्हे,
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ -
लहू रामदास भालेकर, शिवाजी सीताराम खिलारी, विजय विनायक पवार, किसनराव साबाजी रासकर, ग्रामपंचायत आर्थिक दृष्टया दुर्बल भाऊसाहेब सखाराम शिर्के, पंकज अशोक कारखिले,
आडते / व्यापारी मतदारसंघ -
अशोकलाल माधवलाल कटारिया, अशोक फुलाजी चेडे,दत्तू सावित्रा पुजारी, चंदन रमेश भळगट, या उमेदवारांचा समावेश यामध्ये आहे.
हमाल/ मापाडी मतदारसंघ -
नवनाथ सबाजी बुगे, तुकाराम दत्तू चव्हाण, संजय तुकाराम मते, ठकाराम शिवाजी खोडदे, संदीप सुभाष कावरे,
COMMENTS