मुंबई। नगर सहयाद्री - एका इस्टेट एजंटला या महिलेने आपली प्रॉपर्टी विकण्यास मदत करा अशी गळ घालत मैत्री केली. सेक्सटॉर्शनचे रॅकेटचे प्रमाण वाढ...
मुंबई। नगर सहयाद्री -
एका इस्टेट एजंटला या महिलेने आपली प्रॉपर्टी विकण्यास मदत करा अशी गळ घालत मैत्री केली.
सेक्सटॉर्शनचे रॅकेटचे प्रमाण वाढत चालले आहे. स्मार्टफोनचा नुकताच वापर सुरू करणाऱ्या बुजुर्गांना चांगलाच गंडा घालत आहेत. अशाच एका प्रकरणात पेशाने रियल इस्टेट एजंट असलेल्या एका 80 वर्षीय वृद्ध इसमाला एका महिलेचा न्यूड कॉल आल्यानंतर महिलेल्याच्या भूलथापांना फसून आपले आठ लाख रुपये गमावल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, माटुंगा येथील रहिवासी रियल इस्टेट एजंट असून त्यांना एका महिलेचा काही महिन्यांपूर्वी फोन आला होता. या महिलेने तिचे नाव मानसी जैन असे सांगत आपण डॉक्टर असून परळ येथे प्रॅक्टीस करीत असल्याचे सांगितले. तिला तिची काही प्रॉपर्टी विकायची आहे तर तुम्ही मला मदत करा असे तिने या तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर त्यांच्या मैत्री वाढत गेली. एकदा या महिलेने त्यांना न्यूड व्हिडीओ कॉल करीत त्यांनाही कपडे काढायला सांगितले.
दोन दिवसानंतर या महिलेने या तक्रारदाराला धमकी देत तुमचा न्यूड व्हिडीओ आपल्याकडे असून दीड लाख रूपये द्या नाही तर हा व्हिडीओ व्हायरल केला जाईल अशी धमकी दिली. त्यानंतर अन्य एका व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण सीबीआयच्या सायबर क्राईम सेलमधून विक्रम राठोड बोलत असून मानसी जैन यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. या महिलेला कॉल केल्याचा रेकॉर्ड तपासला असता त्यात तुमचे नाव आल्याचे त्याने सांगितले.
विक्रम राठोड नावाच्या या कथित सीबीआय अधिकाऱ्याने या महिलेच्या मोबाईलमध्ये या तक्रारदाराचा व्हिडीओ सापडल्याचे सांगितले. त्यामुळे हे प्रकरण जर मिठवायचे असेल तर तुम्हाला पंधरा लाख द्यावे लागतील. तक्रारदार इसमाने 7.97 लाख रूपये त्या कथित सीबीआय अधिकाऱ्याला दिल्याची तक्रार पोलीसांना केली आहे.
COMMENTS