मुंबई। नगर सहयाद्री - उर्फी जावेद नेहमीच आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे सर्वत्र चर्चेत असते. उर्फीच्या फॅशन सेन्सची अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींन...
उर्फी जावेद नेहमीच आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे सर्वत्र चर्चेत असते. उर्फीच्या फॅशन सेन्सची अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली नाराजी दर्शवली होती तर, काहींनी तिची फॅशन देखील करण्याचा प्रयत्न केला. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी रणबीरने उर्फीच्या फॅशनवर आपली प्रतिक्रिया दर्शवली. रणबीर कपूरने उर्फीच्या लूकला ‘बॅड टेस्ट’ अशी प्रतिक्रिया दिली होती. तर त्यावर उर्फीने तू काहीही बोललास तरी, माझी फॅशन बदलणार
गेल्या काही दिवसांपूर्वी, रणबीरने करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी रणबीरने तिच्या फॅशनवर सडकून टिका केली. रणबीरने आधी स्वत:चे पाहावे. त्याची स्थिती काय आहे? हे आधी पाहावं आणि मग मला बोलावं.उर्फीचे हे विधान चर्चेत आले होते आणि त्याची सर्वत्र चर्चा होत होती. आता उर्फी तिच्या विधानावर माघार घेत असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उर्फी जावेदने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणते, मी असे कधीच म्हणाले नाही. रणबीरने नरकात जावे अशी मी फक्त गंमत करत होते, रणबीर जे काही बोलला तो त्याचा दृष्टिकोन आहे. मला त्याचे विधान अपमानास्पद वाटले नाही. मी त्याला नरकात जाण्यास सांगितले नाही. उर्फी जावेदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यात ती म्हणते, माझ्या विनोदामुळे मला कधीतरी मारहाण होईल. मला माहित आहे, माझ्या कपड्यांमुळे किंवा माझ्या बोलण्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे.
COMMENTS