मुंबई। नगर सहयाद्री - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या सगळीकडे समलैंगिक विवाहाला मान...
मुंबई। नगर सहयाद्री -
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या सगळीकडे समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यावर चर्चा सुरु आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान जेंडर आणि सेशुअल प्रेफरन्स सगळीकडे होणारी चर्चा पाहता त्यावर सुरु झालेल्या वादानंतर कंगनाने मत मांडलं आहे. ’तुम्ही कोणीही असा, तुमचे जेंडर काय आहे, यानं काही फरक पडत नाही.
या मॉर्डन जगात आपण अभिनेत्री, दिग्दर्शिका असे शब्द सुद्धा वापरत नाही. त्यांना देखील आपण अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणतो. तुम्ही या जगात काय करत आहात हीच तुमची ओळख आहे, तुम्ही बेडरूममध्ये काय करता याने तुमची ओळख होत नाही,’ असे कंगना म्हणाली. पुढे कंगना म्हणाली, कधीच कोणत्या व्यक्तीला त्याच्या लिंग किंवा इतर कोणत्याही शारीरिक वैशिष्ट्य लक्षात घेत पाहू नका. तुम्हाला माहित आहे ना कंगना ही फक्त महिला समजणार्यांचे काय झाले. त्यांना पाहून खूप मोठा धक्का बसला, कारण मी अशी व्यक्ती नाही जी स्वत:ला किंवा इतरांना या नजरेने बघेन.
मी नेहमीच अशा एका ठिकाणी असते जिथे फक्त स्त्रीया, पुरुष, होमो, हेट्रो, स्ट्रॉन्ग किंवा मग कमजोर अशा लोकांसोबत नसते. तर मी इथ पर्यंत पोहोचलेच नसते. मी कधी कोणाला त्यांच्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देत नाही. तुम्ही लोक एवढा वेळ कुणाच्या शारीरिकतेवर का घालवता? माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या बाबतीत असे घडले तर तुम्ही फार पुढे जाणार नाही. त्यामुळे स्वत: ला लिंगाच्या विचारांपासून मुक्त करा. जसे आहात तसे उठा आणि चमका. शुभेच्छा.’ कंगनानं केलेलं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
COMMENTS