कोल्हापूर। नगर सहयाद्री- कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील अविवाहित जवानाने सुट्टीवर घरी आल्यानंतर गळफास घेत आत्महत्या केल्याची धक...
कोल्हापूर। नगर सहयाद्री-
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील अविवाहित जवानाने सुट्टीवर घरी आल्यानंतर गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय 23) असे त्यांचे नाव आहे.टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, शिवानंद आरबोळे गेल्या चार वर्षांपासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते. सध्या ते राजस्थानमधील कोटामध्ये कर्तव्यावर होते. अविवाहित असलेल्या शिवानंद लग्नाच्या बेताने 15 दिवसांपूर्वीच गावी सुट्टीवर आले होते. कुटुबीयांकडून लग्नासाठी स्थळ पाहण्यात येत होती. त्यांचे मोठे बंधूही लष्करात कार्यरत असून ते सुद्धा सुट्टीवर आले आहेत. रविवारी शिवानंद कुटुंबीयांसोबत शेतामध्ये गेले होते. यावेळी त्यांनी शेतामध्येच सर्वांसोबत जेवण केले होते. त्यानंतर अंघोळ करायला जातो म्हणून ते घरी निघून आले. घरी आल्यानंतर त्यांनी नाॅयलाॅन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
आई वडिलांसह भाऊ सायंकाळी घरी आल्यानंतर शिवानंद यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही घटना समजताच स्थानिक लोकांनी त्यांना तातडीने गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी जवान शिवानंद यांना मृत घोषित केले. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS