मुंबई। नगर सहयाद्री - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री...
मुंबई। नगर सहयाद्री -
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा? यावर जोरदार चर्चा सुरू आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांकडे पाहत आहेत. जयंत पाटील यांचे नावही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहे.जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा? यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीतअनेक जण इच्छूक असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी स्वत: मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती.
कराडमध्ये एका कार्ययक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले, सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचं आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे.असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
COMMENTS