नवी दिल्ली वृत्तसंस्था- उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे गावातील दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध होते. पतीने पत्नीला प...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे गावातील दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध होते. पतीने पत्नीला प्रियकरासोबत पाहिले अन् पतीला संताप अनावर झाला. मग पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याला संपवल्याची घटना रायबरेलीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, एका महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. प्रियकराच्या मदतीने पतीला रात्री भरपूर दारु पाजली. दारु प्यायल्यानंतर पती नशेत झोपी गेला. पतीला रात्री अचानक जाग आली अन् समोर पत्नीला प्रियकरासोबत नको ते करताना पाहिले. यानंतर पती संतापला आणि त्यांना विरोध करु लागला. यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याला संपवले.
पोलिसाना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.शवविच्छेदन अहवाला हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत प्रकरणाचा तपास सुरु केला.पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी सुरु केली असता पोलिसांना मयताच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
COMMENTS