नागपूर। नगर सहयाद्री - हुंड्यासाठी नवऱ्याने बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार करत पैशांची मागणी केली आहे. हुंड्यासाठी पतीच मास्टरमाईंड होत...
नागपूर। नगर सहयाद्री -
हुंड्यासाठी नवऱ्याने बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार करत पैशांची मागणी केली आहे. हुंड्यासाठी पतीच मास्टरमाईंड होत बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढत पैशांची मागणी केली आहे या प्रकरणी पत्नीच्या तक्रारी नुसार आरोपी पतीविरोधात नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नागपूरच्या मानकापूरभागा मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने हुंड्यासाठी आपल्या बायकोचाच छळ सुरु केला होता. माहेरवरुन पैसे आणण्यासाठी तो वारंवार बायकोकडे मागणी करत होता. ही मागणी पूर्ण होत नसल्याने त्याने बायकोला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.आरोपीने आंघोळ करताना पत्नीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढला.
आंघोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत नवरा बायकोला माहेरवरुन 10 लाख रुपये आणण्याची मागणी करु लागले होते. हुंड्यासाठी फक्त नवराच नाही तर त्याचे आई-वडील देखील पीडित महिलेला त्रास देत होते. पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठत, नवरा, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.
COMMENTS