अहमदनगर। नगर सहयाद्री - नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया काल पार पडली आहे. मतमोजणीस सुरवात झाली आहे. भाजप व ...
अहमदनगर। नगर सहयाद्री -
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया काल पार पडली आहे. मतमोजणीस सुरवात झाली आहे. भाजप व महाविकास आघाडीत मोठा संघर्ष पहावयास मिळाला आहे. दोन्ही गटाच्या नजरा निकालाच्या प्रतीक्षेत असून अंगावर गुलाल घेण्यास सज्ज आहे.
नगर बाजार समितीत पंधरा वर्षापासून भाजप नेते शिवाजी कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांची एकहाती असलेली सत्ता उलथून टाकण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी आपल्या उमेदवाराना रिंगणात उतरुन आव्हान दिले आहे. या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी कांँटे की टक्कर पाहावयास मिळाली आहे.
मतपेट्या फुटल्या...
मतपत्रिकांची जुळवाजुळव सुरु...
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त...
कर्डिले गटाचे खाते उघडले... सातपुते विजयी
पुन्हा कर्डिले गट बाजी मारणार...
संदेश कार्ले आघाडीवर ...
असा दावा राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून काही वेळ निकालाची वाट पहावी लागणार आहे.
सविस्तर थोड्याच वेळात ....
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १६ जागांसाठी ९९ टक्के मतदान झालं आहे. भाजप नेते शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात प्रा. शशिकांत गाडे यांनी पॅनल उभा केलेला होता.आज सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरवात झाली आहे. कर्डिले सत्ता कायम ठेवणार की काही चमत्कार घडवणार याकडे जिल्ह्याचं लक्ष असून दोन्ही गटाच्या नजरा निकालाच्या प्रतीक्षेत असून अंगावर गुलाल घेण्यास सज्ज आहे.
COMMENTS