मुंबई। नगर सहयाद्री - महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलासाठी मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर अली आहे. अनाथ मुलांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्...
मुंबई। नगर सहयाद्री -
महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलासाठी मोठा निर्णय घेतल्याची बातमी समोर अली आहे. अनाथ मुलांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासंबंधी राज्य सरकारने गुरुवारी आदेश जारी केला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,अनाथांसाठी नोकऱ्यांमधील आरक्षण एकूण रिक्त पदांच्या संख्येवर आणि प्रवेशासाठी खुल्या जागांच्या संख्येवर आधारित दिलं जाईल. अनाथांना दोन समान भांगामध्ये विभागले जाईल. एक अनाथाश्रम किंवा सरकारी संस्थांमध्ये नोंदणी केलेले व दुसरे सरकारी संस्थांच्या बाहेर किंवा नातेवाईंनी सांभाळण्यात आलेली मुलं. अशा दोन भागांत विभागणी केली जाईल. असं, गुरुवारी काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.
आई-वडील, भावंड, जवळचे नातेवाईक, गाव, तालुका याविषयी माहिती नसताना अनाथाश्रमात राहणाऱ्या मुलांची 'A' वर्गवारी करण्यात आली आहे.
ज्या मुलाने दोन्ही पालक गमावले, ज्याच्याकडे जात प्रमाणपत्र नाही आणि अनाथाश्रमात राहात आहे त्यांचा 'B' या वर्गवारीत समावेष करण्यात आला आहे.
ज्या मुलांनी १८ वर्षे पूर्ण होण्याआधी दोन्ही पालक गमावले असतील परंतु नातेवाईकांनी त्यांना वाढवलेले असेल ते 'C' श्रेणीत येतील.
पण 'C' श्रेणीमधील अनाथ मुलांना शिक्षणात सर्व सवलती मिळतील पण सरकारी नोकऱ्यांसाठी ते पात्र नसतील,असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
COMMENTS