प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रतिनिधी अशोक गाडीलकर यांचा आंदोलनाचा इशारा सुपा | नगर सह्याद्री नव्याने उभारत असलेल्या सुपा एमआयडीसीमध्ये स्थानिक प्र...
प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रतिनिधी अशोक गाडीलकर यांचा आंदोलनाचा इशारा
सुपा | नगर सह्याद्री
नव्याने उभारत असलेल्या सुपा एमआयडीसीमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकर्या आणि कंत्राटी कामे देण्यास कंपनी व्यवस्थापन जाणीवपूर्वक टाळत असल्याने दि. १७ एप्रिलपासुन आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रतिनिधी अशोक गाडीलकर यांनी दिला आहे.
प्रकल्पासाठी शेतजमिनी अधिग्रहित करतेवेळी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वाटप केलेल्या भूखंड धारकासोबत म्हणजेच कंपनीसोबत केलेल्या प्राथमिक करार नाम्यातील अटीनुसार नोकरीमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी प्राधान्याने देण्याचे मान्य केलेले आहे. नोकरीची संधी देणे शय नसेल तर विविध कंत्राटी कामांसाठी प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देणे न्यायोचित आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार नोकरीमध्ये ८०% प्राधान्य हे कामगार म्हणून आणि ५०% सुपरवायझरी स्टाफ म्हणून स्थानिकांना देणे आवश्यक आहे.
मात्र असे होत नसल्यामुळे विधायक मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. एमआयडीसी वाढीवर परिणाम होऊ नये यासाठी कंपनी व्यवस्थापन व सरकारी अधिकार्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढून स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना प्राधान्याने नोकरीमध्ये अथवा कंत्राटी कामांमध्ये सामावून घेणे गरजेचे आहे.कंपनी प्रशासनाच्या कुठल्याही अधिकार्यांशी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे कसलेही वैर नाही परंतु वारंवार कामासाठी/नोकरीसाठी विनवणी करूनही अधिकार्यांकडून नेहमीच डावलले जाते.
कुठल्याही अधिकार्याला किंवा कंपनीला बदनाम करण्याचा मुळीच हेतू नाही परंतु जमिनी देऊन नोकर्यांमध्ये अथवा कंत्राटी कामांमध्ये किमान स्वरूपाची सुद्धा संधी मिळत नसेल तर एमआयडीसी सुरू होऊन फायदा काय अशी भावना निर्माण झाल्याचे गाडीलकर यांनी म्हटले आहे.
COMMENTS