मुंबई| नगर सहयाद्री शाहरुख खान आणि गौरी खान ही बॉलिवूडची सर्वात लाडकी जोडी आहे.अनेकदा हे कपल अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. कधी डिनर डेटव...
मुंबई| नगर सहयाद्री
शाहरुख खान आणि गौरी खान ही बॉलिवूडची सर्वात लाडकी जोडी आहे.अनेकदा हे कपल अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. कधी डिनर डेटवर जातात. तर कधी वेकेशनला जाताना हे कपल स्पॉट होतं. तर कधी पुर्ण फॅमिलीसोबत स्पॉट होत. तर बर्याचदा ही जोडी बॉलिवूडच्या अनेक इव्हेंट्सला जाताना स्पॉट होतात. नुकतीच ही जोडी ता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर लॉन्च इवेंटला पोहचली होती. या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ज्यामुळे शाहरुख आणि गौरी चर्चेत आले आहेत. व्हायरल होणार्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खान भर कार्यक्रमात गौरीवर ओरडताना दिसत आहे. शाहरुख खान पठान सिनेमामुळे खूप चर्चेत होता. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत बर्याच सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावणार शाहरुख खान या दिवसांत आपली पत्नी गौरी खानमुळे चर्चेत आहे. एवढंच नव्हेतर त्यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांच्यात बिनसल्याच्या बातम्या सध्या व्हायरल होत आहेत.
एवढंच नव्हेतर हे कपल लवकरच वेगळं होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुख आणि गौरी खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शाहरुख खान मात्र जबरदस्त ट्रोल होत आहे. तर काही लोकांचं म्हणणं आहे की, शाहरुख खान या व्हिडिओमध्ये मद्यपान केल आहे. म्हणून तो त्याची पत्नी गौरी खानवर रागवला आहे.
COMMENTS