नवी दिल्ली वृत्तसंस्था- सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बोलत होते. ‘देशा...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बोलत होते. ‘देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही केंद्रीय तपास संस्थेची (सीबीआय) मुख्य जबाबदारी आहे. न्याय आणि न्यायाचा ब्रँड म्हणून सीबीआयचे नाव सर्वांच्या ओठी आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी सीबीआयचे कौतुक केले. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सीबीआयला समोर कोण आहे हे पाहून थांबण्याची गरज नाही,’ असे ठाम प्रतिपादन केले.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार,पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाही आणि न्यायाच्या मार्गातील भ्रष्टाचार हा सर्वात मोठा अडथळा आहे,’ असे ते म्हणाले.सरकारने काळा पैसा, बेनामी मालमत्तेविरुद्ध मिशन मोडमध्ये कारवाई सुरू केली. विकसित भारताची निर्मिती व्यावसायिक आणि कार्यक्षम संस्थांशिवाय शक्य नाही, त्यामुळे सीबीआयवर मोठी जबाबदारी असल्याचे सांगून ‘आजही एखाद्या प्रकरणाची उकल होत नसेल, तर ते सीबीआयकडे सोपवण्याची मागणी होते. तुम्हाला कुठेही थांबण्याची गरज नाही,’ असे त्यांनी नमूद केले.
तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडायचे नाही. २०१४ नंतर आम्ही भ्रष्टाचार, काळ्या पैशाविरोधात मिशन मोडमध्ये काम सुरू केले. यामुळे आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एखादे प्रकरण सीबीआयकडेच सोपवावे असे अनेकदा लोकांचेच म्हणणे असते. न्याय आणि न्यायाचा ब्रँड म्हणून सीबीआयचे नाव सर्वांच्या ओठी आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी सीबीआयचे कौतुक केले. सीबीआयच्या कामाकाजात आत्तापर्यंत योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे .
COMMENTS