मुंबई। नगर सहयाद्री भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. तिने टोकाचं पाऊल का उचललं हे स्पष्ट झालं ...
मुंबई। नगर सहयाद्री
भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. तिने टोकाचं पाऊल का उचललं हे स्पष्ट झालं नाही. मात्र याप्रकरणी दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. बुधवारी आकांक्षाचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ३८ सेकंदांच्या व्हिडीओत ती रडताना दिसते. मला माहीत नाही मी काय चूक केली? मला या जगात नाही राहायचंय. मी तुम्हा लोकांशी हे शेवटचं बोलतेय, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. इतकंच नव्हे तर तिला काही झालं तर त्याला कोणती व्यक्ती जबाबदार असेल याचंही नाव तिने व्हिडीओत घेतलं आहे.
व्हिडीओमध्ये आकांक्षा पुढे म्हणाली, मला काहीही झाल्यास त्याला समर सिंह जबाबदार असेल. समर आकांक्षाचा एस बॉयफ्रेंड आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्याला आणि त्याचा भाऊ संजय सिंहला अटक केली होती. आता नवीन व्हिडीओ समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या समर आणि संजय यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. आकांक्षाचा हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. आकांक्षाची आई मधू दुबेचे अधिवक्ता शशांक शेखर त्रिपाठी यांनी बुधवारी अभिनेत्रीचा एक फोटो आणि व्हिडीओ सर्वांसमोर आणला.
या फोटोमध्ये आकांक्षाचे डोळे सुजलेले दिसतात. व्हिडीओमध्ये ती रडत आपलं दु:ख सांगताना दिसतेय. शशांक यांच्या मते आकांक्षाचा हा व्हिडीओ फार जुना नाही. न्यायालयात तो सादर करून समर सिंहविरोधात कारवाईची मागणी केली जाईल. २०१९ मध्ये आकांक्षाने भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. मेरी जंग मेरा फैसला’ हा तिचा पहिला चित्रपट होता.
COMMENTS