अहमदनगर | नगर सह्याद्री नेवासा तालुयातील एका गावातील युवतीवर संगमनेर येथील तरूणाने नगर शहरातील हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची घटना शनिवारी (द...
अहमदनगर | नगर सह्याद्री
नेवासा तालुयातील एका गावातील युवतीवर संगमनेर येथील तरूणाने नगर शहरातील हॉटेलमध्ये अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि. ८) घडली. पूर्वीच्या ओळखीचा गैरफायदा घेत तरूणाने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
पीडित युवतीने या प्रकरणी शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूद्ध अत्याचार व अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. समीर पटेल शेख (रा. मालदाड रोड, तिरंगा चौक, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला तोफखाना पोलिसांनी रात्रीतून ताब्यात घेत अटक केली. फिर्यादी युवतीची ओळख समीर पटेल शेख सोबत २०१९ मध्ये झाली होती.
युवती दोन आठवड्यापासून नगर शहरात राहत होती. तिचे लास सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी ती नेवासा तालुयातील तिच्या गावी गेली होती. दरम्यान समीरसोबत ओळख असल्याने ती त्याला भेटण्यासाठी शनिवारी नेवासा येथून बसने नगरमध्ये आली. समीरने तीला तारकपूर बस स्थानकावरून घेतले व ते दोघे शहरातील एका हॉटेलमध्ये गेले. तेथील रूममध्ये समीरने युवतीवर बळजबरीने अत्याचार केला.
दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास पीडित युवती व समीर हॉटेलच्या खाली आले असता तेथे गर्दी जमा झाली होती. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी युवतीला पोलीस ठाण्यात आणले. पीडित युवतीच्या फिर्यादीवरून समीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
COMMENTS