मुंबई। नगर सहयाद्री - राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल लवकरच हाती येण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी काही दिवसांपुर्वीच शिवसेना भवन आणि पक्षनिध...
मुंबई। नगर सहयाद्री -
राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल लवकरच हाती येण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी काही दिवसांपुर्वीच शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. शिवसेना भवन उद्धव ठाकरेंचे की एकनाथ शिंदे यांचे? शिवसेनेच्या शाखा कोणाच्या? अॅड. आशिष गिरी यांनी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवरआज सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती द्यायची की नाही याबाबत ही सुनावणी होती. यावेळी संपत्ती शिंदेंना द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने शिंदे यांची याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखांचा ताबा ठाकरे गटाकडेच राहणार आहे.
नेमके प्रकरण काय?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. तब्ब ४० आमदार सोबत घेऊन ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यांनाच शिवसेना पक्षही मिळाला. इतके झाल्यानंतर शिंदे यांनी आपण शिवसेना भवनावर दावा सांगणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्यात शिवसेना भवन, शिवसेना पक्षाचा निधी एकनाथ शिंदे यांना द्यावा. सोबतच शिवसेनेच्या शाखा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी केली होती.
COMMENTS