अहमदनगर | नगर सह्याद्री- शक्ती आणि भक्तीच मिलाप म्हणजे बजरंगबली होय. प्रभु रामचंद्रांची नि:स्सीम भक्ती करुन निष्ठा कशी असावी भगवंत हनुमानांन...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
शक्ती आणि भक्तीच मिलाप म्हणजे बजरंगबली होय. प्रभु रामचंद्रांची नि:स्सीम भक्ती करुन निष्ठा कशी असावी भगवंत हनुमानांनी आपल्या सेवेतून दाखवून दिले आहे. हा आदर्श आपल्या जीवनात अंगीकृत करण्याची गरज आहे. हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटपातून सामाजिक ऐय निर्माण होण्यास मदत होते. प्रसादाचे महत्म्य मोठे असल्याने भाविकांना लाभ घेऊन तुप्त होत आहे. ही तृप्तीच आपणा सर्वांना समाधान देणारी आहे, असे प्रतिपादन मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी केले.
हनुमान जयंतीनिमित्त नाना पाटील वस्ताद तालिमच्यावतीने मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी, संजय सागावकर, मळू वामन, बजरंग शेळके, दत्ता ठाणगे, नितीन रोहोकले, बाबू दिवेकर, बबन राजापुरे, सुभम वाघ, पंकज शिंदे, प्रकाश तांबोळी, आधु कवडे, रामभाऊ नळकांडे, अनिल कवडे, पै.सनी शिंदे, राधेश्याम धूत, गणेश हडोळे, ओंकार कवडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, हनुमान जयंतीची नालेगांवची मोठी परंपरा आहे. दरवर्षी नालेगांव येथील नाना पाटील वस्ताद तालिम येथील युवकांनी सालाबाद प्रमाणे प्रवरासंगम येथून कावडीने पाणी आणून जलाभिषेक केला जातो. युवकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमानाची उपासना करुन अनेक कुस्तीची मैदानी गाजवली आहेत. जयंतीनिमित्त महाप्रसादाचा घेतलेला लाभ भाविकांना समाधान देऊन जाणारा आहे.
COMMENTS