अहमदनगर | नगर सह्याद्री- शेअर ट्रेडिंगमध्ये पैशांची गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाची ७ लाख ५ हजार रूपयांची...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
शेअर ट्रेडिंगमध्ये पैशांची गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाची ७ लाख ५ हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाविरूध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहेबाज रौऊफ सय्यद (वय ३७, रा. पोलिस कॉलनी, सुर्यानगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
ही घटना दि. १३ ऑगस्ट २०२१ ते १४ जुलै २०२२ दरम्यान घडली. यासंदर्भात सय्यद यांनी दि. ६ रोजी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ऋषीकेश साहेबा जोगदंड फोन पे नंबर ९५११८०१७०५ धारक याने शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून अधिक नफा मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची ७ लाख ५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सायबर पोलिस करीत आहेत.
COMMENTS