मंजू गढवाल यांनी आलियावर गंभीर आरोप केले आणि सांगितले की, 'आलियाने चार वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांकडून चित्रपट करण्यासाठी ५० लाख रुपये घेतले होते.
मुंबई / नगर सह्याद्री -
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. अभिनेत्याची पत्नी आलिया त्याच्यावर सतत गंभीर आरोप करत असते. परंतु या सगळ्यात नवाजची पत्नी आलियाच्या अडचणी वाढ झाली आहे.
यापूर्वी नवाजची पत्नी आलियाने पतीवर गंभीर आरोप केले होते. परंतु नवाजने पत्नीचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि ते निराधार असल्याचे म्हटले. या संपूर्ण प्रकरणावर आपले स्पष्टीकरण देताना नवाज म्हणाले की, लोकांना जाणूनबुजून चुकीचे चित्रण केले जात आहे. आता बातम्या येत आहेत की, आलियाची जवळची मैत्रिण मंजू गढवाल हिने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंजू गढवाल यांनी आलियावर गंभीर आरोप केले आणि सांगितले की, 'आलियाने चार वर्षांपूर्वी माझ्या आई-वडिलांकडून चित्रपट करण्यासाठी ५० लाख रुपये घेतले होते. आता इतकी वर्षे उलटून गेली तरी ती रक्कम परत करण्याचे नाव घेत नाही. आलियाने माझ्या कुटुंबाकडून २७ लाख रुपये उसने घेतले होते. एवढेच नाही तर तिने चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याला अद्याप सात लाख रुपये परत केलेले नाहीत.
मंजू पुढे म्हणाली, 'आलियाचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी तिने मला चेक दिला होता, पण तो बाऊन्स झाला, त्यानंतर तिने मला १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सर्व पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत ते आश्वासन पूर्ण झाले नाही. हे प्रकरण आता कोर्टात पोहोचले असून आलियाला डिमांड नोटीस पाठवण्यात आली आहे.
आलिया बऱ्याच दिवसांपासून नवाजवर वेगवेगळे आरोप करत होती, ज्यावर नवाजने कधीच भाष्य केले नाही, पण आपल्या मुलांसाठी त्याने मौन तोडले आणि सत्य जगाला सांगितले. नवाजच्या या निर्णयावर त्याच्या चाहत्यांपासून ते इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सकडून त्यांना साथ मिळाली. इतकेच नाही तर अभिनेत्री कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर नवाजच्या समर्थनार्थ एक पोस्टही शेअर केली होती.
COMMENTS