मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आह...
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय, डान्स , सिनेमे इत्यादी गोष्टींमुळे ती कायम चर्चेत असते. ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. विद्या बालनने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहे. पण एकेकाळी तिलाही अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते.
बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचे नाव या यादीत जोडले गेले जेव्हा तिने अलीकडेच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीतत कास्टिंग कशी स्वत:ची सुटका केली याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. विद्या बालनने सांगितले की, एका दिग्दर्शकाने तिला एका खोलीत एकटीला भेटण्यासाठी बोलावले होते.
मुलाखतीत विद्या बालन म्हणाली, 'मी कधीच कास्टिंग काउचचा सामना केला नाही, ज्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. मी अनेक भयकथा ऐकल्या होत्या. जेव्हा मी फिल्म लाइनमध्ये येत होते तेव्हा माझ्या आई-वडिलांना हीच सर्वात मोठी भीती होती. म्हणूनच त्या लोकांना मी चित्रपटात दिसावं असं वाटत नव्हतं. पण माझ्यासोबत एक घटना घडली आहे. मला आठवते की मी एक चित्रपट साइन केला होता आणि मला दिग्दर्शकाला भेटायचे होते. त्यादरम्यान मी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी चेन्नईला जात होते.
विद्या पुढे म्हणाली, 'दिग्दर्शकाने मला सांगितलं की, जेव्हा तू चेन्नईला येशील तेव्हा भेटू. मी सांगितले की, मी एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी चेन्नईला येणार आहे. मग तेव्हाच भेटू. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो, पण तो दिग्दर्शक माझ्यावर त्याच्या खोलीत जाऊन बोलण्यासाठी वारंवार दबाव आणत होता. त्यावेळी मला काही समजू शकले नाही कारण तेव्हा मी एकटीच होते. पण मी हुशारी दाखवली आहे. त्याच्या खोलीत पोहोचल्यावर मी दार उघडंच ठेवले. कदाचित त्याला समजले असेल की, त्याच्यासाठी एकच मार्ग आहे. या घटनेनंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे.
COMMENTS