पुणे / नगर सह्याद्री - एखाद्या राजकीय विधानावर जर राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जन्मठेप होऊ शकत...
पुणे / नगर सह्याद्री -
एखाद्या राजकीय विधानावर जर राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जन्मठेप होऊ शकते अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोदी आडनावावरून अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही या निर्णयावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या इंडियात होऊ शकते,हाच नियम लागू केला तर पंतप्रधान मोदींसह भाजपाच्या अनेक नेत्यांना जन्मठेप होईल, असे ट्विट त्यांनी केले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटच्या कोलार येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. यावरून भाजपाचे माजी आमदार पुरनेश मोदी यांनी गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. गेल्या आठवड्यात सुनावणी पार पडली . न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे .
COMMENTS