नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने टीव्हीवरील त्याच्या पुनरागमनाबद्दल सांगितले आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
कपिल शर्मा शोमधील गुत्थी ही व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. या भूमिकेत सुनील ग्रोव्हरने जीव ओतला होता. गुत्थीने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. मात्र, कपिलसोबत झालेल्या भांडणानंतर सुनील ग्रोव्हरने शो सोडला. सुनील ग्रोव्हर बऱ्याच दिवसांपासून टीव्ही जगतापासून गायब आहे. या घटनेला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि यादरम्यान अभिनेता कोणत्याही टीव्ही शोमध्ये दिसला नाही. मात्र, तो लवकरच शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने टीव्हीवरील त्याच्या पुनरागमनाबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला की, टीव्ही हे खूप मोठे माध्यम आहे. आज मी जो काही आहे तो फक्त टीव्हीच्या दुनियेमुळे मला टेलिव्हिजनवर परतण्याची खूप इच्छा आहे, ज्यासाठी मी तयारी करत आहे आणि यादरम्यान मला कोणतीही चांगली ऑफर मिळाली तर मी कोणताही विलंब न करता टीव्हीवर परतेन. सुनील ग्रोव्हरच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की त्याला लवकरच आपल्या टीव्ही प्रेक्षकांशी जोडायचे आहे. तो कोणत्याही प्रोजेक्टबद्दल बोलला नसला तरी तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास उत्सुक आहे.
सुनील ग्रोव्हर त्याच्या युनायटेड कच्च्या या वेबसिरीजमध्ये व्यस्त आहे. या मालिकेत सुनीलसोबत सतीश शहार, सपना पब्बी, निखिल विजय हे कलाकार दिसणार आहेत. द कपिल शर्मा शोमधून बाहेर पडल्यानंतर या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे., त्याने अनेक वेब सीरिजमध्येही काम केले आहे. पटाखा या चित्रपटात या अभिनेत्याने सान्या मल्होत्रा आणि राधिका मदानसोबत काम केले होते. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तो सनफ्लॉवरमध्ये दिसला होता. आता तो लवकरच शाहरुख खानसोबत 'जवान'मध्ये दिसणार आहे, त्याबद्दल त्याचे चाहतेही खूप उत्सुक आहेत.
COMMENTS