अहमदनगर | नगर सह्याद्री शहरात शिवजयंती मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करुन ध्वनी प्रदुषण केल्याप्रकरणी अनेक मडळांचे पदाधिकारी व डी.ज...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरात शिवजयंती मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करुन ध्वनी प्रदुषण केल्याप्रकरणी अनेक मडळांचे पदाधिकारी व डी.जे.चालक, मालक यांच्यावर गुन्हा दाखल करुन साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या संदर्भात पो.ना.योगेश सिताराम खामकर यांनी फिर्याद दिली आहे.कोतवाली पोलीस ठाण्याचे पा.नि.चंद्रशेखर यादव यांनी ठाकरे गट, शिंदे गट तसेच विविध मंडळांच्या पदाधिकार्यांना आवाजाची मर्यादा पाळण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. मिरवणुक सुरु झाल्यानंतर डी.जें.चा आवाज क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले त्यामुळे पोलीसांनी किती डेसिबलचा आवाज आहे याची इम्पिरियल चौकापासुनच तपासणी सुरु केली. पोलीस उपनिरिक्षक सुखदेव दुर्गे, महेश बोरुडे इस्माईल पठाण यांनी पंचासमक्ष तपासणी केली असता अखंड हिंदू समाज माळीवाडा राजाचा डी.जे.१०४.७ इतक्या क्षमतेने, शिवजयंती उत्सव नालेगाव १०९.०, वर्चस्व ग्रुप ११२.२, हिंदू राष्ट्रसेना ११०.५, शिवसेना शिंदे गटाचा डि.जे.११३.९, तुळजाभवानी युवा मंच, १०५.७, शिवसेना ठाकरे गट ११३.७ इतक्या मोठ्या आवाजात डि.जे.वाजवुन ध्वनी प्रदुषण करीत होते.
या संदर्भात पोलीसांनी मंडळाचे पदाधिकार्यांना आवाजाच्या रिंडींगची पावती देण्याचा प्रयत्न केला पण पदाधिकार्यांनी पावती घेतली नाही व ध्वनी प्रदुषण चालुच ठेवले.त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी, डी.जे.चालक, मालक यांच्यावर भादवी कलम १८८, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
COMMENTS